अजित पवार मोठा भूकंप करण्याच्या तयारीत आहेत का?

अजित पवार मोठा भूकंप करण्याच्या तयारीत आहेत का?

जशी जशी निवडणूक जवळ येईल तसतसे राजकीय पक्ष डावपेच आखण्यात यशस्वी झाले आहेत. नवीन नवीन वक्तव्य करून राजकीय पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या जणू चढाओढ लागली आहे. अजित दादांना राजकीय  भूकंप काही नवीन नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक राजकीय भूकंप करून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडले आहे. अशातच सध्या अजित दादा नवीन नवीन वक्तव्य करून त्यांच्या मनातील राजकीय भूकंपाची इच्छा आमलात तर आणत नाही ना असे संभ्रम निर्माण झाला आहे.

अजित दादांनी शरद चंद्र पवार यांच्याशी फारकत घेऊन निवडक आमदारासह वेगळा राष्ट्रवादी गट स्थापन केला होता. ते  महायुतीला जाऊन मिळाले होते. बिनशर्त पाठिंबा जाहीर करून त्यांनी उपमुख्यमंत्री पद मिळवले. परंतु मध्यंतरी लोकसभेचा पराभव त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला असून त्याची खदखद त्यांच्या मनातून व्यक्त होत आहे. सध्या त्यांनी बारामती मध्ये बोलताना म्हटले की मी सोडून जर दुसरा आमदार झाला तर माझे महत्त्व तुम्हाला कळणार आहे. असे वक्तव्य करून ते बारामती मधून माघार तर घेत नाही ना असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पवार यांचा पराभव झाला होता. जर मतदारसंघांमध्ये काम करून पराभवच वाटेल येत असेल तर काम करून काही उपयोग नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. परंतु त्यांच्या मनातील माघार घेण्याच्या प्रश्नावरून कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून निवडणूक लढवावीच अशी विनंती केली.

दरम्यान छगन भुजबळ यांनी अजितदादा हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशी शाश्वती दिली. त्यांनी फक्त गेल्या पराभवाचा विचार करून असे बोलून गेले असे त्यांनी म्हटले आहे. तो पराभव त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागला असल्यामुळे ते असे बोलले असावे असा अंदाज छगन भुजबळ यांनी मांडला. जर पक्षाच्या कॅप्टननेच शस्त्र टाकले तर अवघड आहे .अजितदादा हे आमच्या पक्षाचे कॅप्टन आहेत ते कधीही शस्त्र खाली टाकणार नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

दरम्यान संजय राऊत यांनी अजितदादावर निशाणा साधत म्हटले आहे की त्यांना बारामती मधून पराभव दिसू लागल्याने त्यांचे असे वक्तव्य नैराश्यातून येत आहेत. त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतो आहे. तसेच काँग्रेस मधील विजय वडेट्टीवार यांनी देखील अजित दादांना चिमटा काढला असून शरद पवाराकडे त्यांचा निभाव लागणार नाही असे त्यांना वाटत असावे. घरामध्ये फूट पाडणे हे लोकांना आवडलेलं नाही. त्यांनी आपली चूक मान्य केले आहे असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अजित दादा काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment