आज पंतप्रधान मुंबईत आणि राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार, प्रचाराचा धुरळा उडणार !
महाराष्ट्र: राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच नेतेमंडळींनी तयारीला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशाकरता महाराष्ट्राच्या निवडणुका या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. महाराष्ट्र मधील महाविकास आघाडी आणि महायुती कसा जोरदार सामना रंगणार आहे. दसऱ्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहेत.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक झालेल्या बंडा नंतर पहिल्या विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रामधील विविध पक्षातील दिग्गज नेते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये येणार आहेत. यांचा नियोजित दौरा काल होता परंतु विमानातील तांत्रिक अडचणीमुळे तो आजवर ढकलण्यात आला.
महायुतीच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब हे देखील मुंबईमध्ये येणार आहेत. मागच्या आठवड्यामध्ये पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते परंतु पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. आज ते ते मुंबई दौऱ्यावर येणार असून मोदींच्या हस्ते मेट्रो तीनच्या कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील होणार आहे.
मुंबईनंतर माननीय पंतप्रधान हे वाशिम दौऱ्यावर जाणार असून नवरात्रीमुळे पोहरादेवी येथे देवीचे दर्शन केल्यानंतर पोहरादेवी या ठिकाणी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्त्याचे वितरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन देखील होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते 23 हजार 300 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ होईल.
तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोल्हापूर मध्ये येणार असून त्यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानला जात आहे. त्यांच्या हस्ते कसबा बावडा येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी हे एका सभेमधून उपस्थितीना संबोधित करणार आहेत. या सर्व कार्यक्रमाची तयारी महाविकास आघाडीने जोरात केली आहे.
मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राष्ट्रीय नेते हे महाराष्ट्र मध्ये दाखल होत असून यामुळे महाराष्ट्रीयन निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होण्याची शक्यता न करता येत नाही.
महचे ठळक बातम्या
आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप, यामुळे भाजपमध्ये पसरला नाराजीचा सूर?
चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक काय आहे नेमकं प्रकरण
Big News महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग झाली सुरू, किती आहे त्याची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये