आता शेतकरीही वीज विकणार आणि पैसे कमवणार -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी वीज ही अत्यंत मोलाची गोष्ट मानली जाते. विजय शिवाय शेतकरी आपल्या शेतीमध्ये पिकांना पाणी देऊ शकत नाही परंतु सतत विजेच्या लपंडाव आणि लोड शेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून सुद्धा आपले पिकांना पाणी द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राणी धोका निर्माण होत असतो.
परंतु महाराष्ट्र सरकारने आता मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू केल्यामुळे शेतकऱ्यांना विजेची गरज भासणार नाही किंवा त्याची वाट पाहत बसावी लागणार नाही. पारंपारिक सौर ऊर्जेचा वापर करून त्यांना आपल्या शेतीमध्ये पिकांना पाणी देता येणार आहे. कृषी पंपाच्या सौर जोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागल्यामुळे त्रस्त होत होते. परंतु आता मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू केल्यामुळे शेतकरी स्वतःची विजेची गरज भागवून उरलेली वीज विकून त्यातून पैसा सद्धा कमवू शकणार आहे असे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सौर कृषी पंप या योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच नोंदणीसाठी महावितरण एक संकेतस्थळ तयार केले आहे या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहे. याबरोबरच या योजनेची माहिती देणारे माहिती पुस्तिकेचे देखील यावेळी अनावरण माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
सौर पॅनल मध्ये तयार होणाऱ्या अतिरिक्त उर्जेमधून ती वीज ग्रीडमध्ये पाठवता येते त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन देखील निर्माण होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ही योजना चालू झाल्यामुळे शेतकरी हा वीज बिल भरणारा नसून वीज विकणारा अशी ओळख त्यांची तयार होईल. 2014 पूर्वी वीज लोड शेडिंगची समस्या शेतकऱ्यांना प्रचंड भेडसावत होती परंतु त्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडण्या जास्तीत जास्त देण्यात आल्या आणि आता मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 90% सबसिडी देखील देण्यात येत आहे.
सौर कृषी पंप पदावर शेतकऱ्यांना भरवशाची दिवसा वीज मिळणार असून ही वीज अखंड 25 वर्ष चालू राहील. यामुळे शेतकऱ्यांना 25 वर्षाचे बिल हे शून्य असणार आहे. हिशोब करायचा झाला तर या कालावधीतील बिल हे दहा लाख रुपये इतके शेतकऱ्यांचे वाचणार आहे.
महत्वाच्या बातम्या
बळीराजासाठी आनंदाची बातमी- कांद्यामधील निर्यात शुल्क पूर्ण हटवले.
मोठी घोषणा , अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव बदललं हे असं नवीन नाव..
माझ्याकडे सुद्धा यादी तयार आहे 25 आमदार पाडणार