आपल्या ठुमक्याने आग लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लागली स्टेजला आग
तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली गौतमी पाटील हे नाव तर माझ्या ओठावर सतत असते. तिची नृत्य कला पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक कार्यक्रमाला गर्दी करत असतात. तरुणाई मध्ये तिची क्रेझ पाहायला मिळते. मध्यंतरी तिचे मानधन किंवा तिच्या लग्नाविषयी असलेली उत्सुकता असे प्रश्न लोकांच्या मनात पडलेले होते परंतु तिचे विश्लेषण तिने अगदी तिच्या शैली मध्ये केले होते.
अचलपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये गौतमी पाटील च्या नृत्याचा कार्यक्रम महान नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परतवाडा येथे तो कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम चालू असताना स्टेजला आग लागली असल्याचे खाली असलेल्या तरुणांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी कार्यक्रम आयोजकांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर सुरक्षा रक्षक त्या आगीकडे धावून गेले. आग लागल्यानंतर एकच तारांबळ प्रेक्षकांमध्ये उडाली होती.
प्रथमदर्शनी असे दिसत होते की ही आज स्टेजवर लावण्यात आलेल्या फायर कॅन्डल मुळे लागली होती. आग लागल्याचे निदर्शनास येतात गौतमी पाटील च्या अंगरक्षकांनी गौतमी पाटील ला बाजूला केले. आणि आज विझवण्याचा प्रयत्न केला.
आग लागले क्षणी सुरक्षारकक धावून गेल्यामुळे कोणतेही दुर्घटना झाली नाही. लागलीच ती विजन आल्यामुळे जास्त ती पसरली देखील नाही. स्टेजवर ठेवण्यात आलेल्या फायर पासून ठिणगी उडाल्यामुळे ही आग लागल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. मात्र या दुर्घटनेपासून कोणालाही इजा किंवा जखम झाली नाही कार्यक्रम त्या क्षणी बंद करण्यात आल्याचे आयोजकाने जाहीर केले.
गौतमी पाटील चा कार्यक्रम म्हटलं की अहवाल वृद्धांपासून ते मोठ्या पर्यंत सेलिब्रिटी सामान्य माणसापर्यंत मोठी गर्दी होत असते. मोठमोठ्या कार्यक्रमात तिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. साधी भाषा तिचा तो साधेपणा तिच्या सौंदर्य आणि तिच्या नृत्याच्या आधार यामुळे ती जनमानसात प्रसिद्ध आहे. अगदी थोड्या कालावधीमध्ये तिने खूप मोठा स्टार डम निर्माण केला आहे.