उद्या ते लालबागच्या राजाला गुजरातला नेण्यासाठी प्रस्ताव देतील संजय राऊत यांची घनाघाती टीका
Sanjay Raut On Amit Shah जसजसं निवडणुकचे वारं वाहील तसतशा विविध राजकीय पक्षांमधील नेते एकमेकांवर टीका करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असून, या निमित्ताने ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.देशाच्या गृहमंत्र्यांनी निःपक्षपाती वागण्याचा सल्ला ही राऊत यांनी दिला
भारताचे केंद्रीय गृहमंत्री हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून या दौऱ्या दरम्यान ते विधानसभा रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महायुतीमधील विविध पक्षातील जागा वाटपाचे नियोजन सुद्धा होणार असल्याचे बोलले जात आहे
सोमवारी अमित शहा आहे लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून ही संधी साधून संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तिकडे मणिपूर जळत असताना शहा तिकडे जात नाही परंतु इकडे मुंबईत आहेत यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे तसेच त्यांनी काश्मीरला जावे आणि मणिपूरला देखील जावे असा सल्ला देखील शहा यांना दिला आहे. मुंबई तमचे काय काम आहे असा प्रश्न देखील त्यांनी शहा यांना विचारला आहे.
महाराष्ट्राची लूट करण्यासाठीच अमित शहांचे दौरे होत असल्याची टीका संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्र स्वाभिमान त्यांना डोळ्यात खूप तो आहे तसेच महाराष्ट्राची सुख त्यांना बघवत नाही महाराष्ट्र त्यांना तोडायचा आहे. अशी टीका सुद्धा त्यांनी केली.
पुढे राऊत म्हणाले की अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना कुठेही जाण्याची परवानगीची गरज नाही परंतु ते महाराष्ट्र मध्ये येताना संकुचित भावनेने येत असतात. त्यासाठी त्यांना विरोध केला जात आहे. मध्यंतरी जे फोडाफोडी जर राजकारण केले ते लोकांना पटलेलं नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी असून मुंबईतले आणि महाराष्ट्रातील उद्योग व्यापार व्यवसाय त्यांना गुजरातला द्यायचे आहेत का असा प्रश्न देखील त्यांनी केला.
ते आज गृहमंत्री जरी असले तरी ते एक कमजोर गृहमंत्री म्हणून समजले जातात महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली ढासळलेली आहे.
उद्या ते लालबागच्या राजाला देखील गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील अशी खरमरीत टीका राऊत यांनी अमित शहा यांच्यावरती केली. देवाच्या दर्शनाला येण्यासाठी आमचा विरोध नसून त्यांच्या पूर्वीच्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेला आमचा विरोध आहे असे देखील त्यांनी म्हटले. हे व्यापारी लोक आहेत हे काहीही करू शकतात असे राऊत म्हणाले.
अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ केले आहे. कायदा सुव्यवस्था राखणे त्यांचे प्रथम कर्तव्य असून त्यात ते राखण्यात सपशेल यशस्वी ठरले असल्याची टीका देखील त्यांनी केली.