ऑनलाइन पेमेंट मध्ये भारताने बनवला रेकॉर्ड चीनला सुद्धा टाकले मागे
भारतामध्ये सगळीकडे आता डिजिटल पेमेंट या विषयाची माहिती पसरलेली आहे सर्वांना माहिती झाली आहे. भारताचे पंतप्रधान यांनी डिजिटल पेमेंट जास्तीत जास्त भारतीयांच्या वापरात असावे अशी घोषणा केली होती. यामुळे स्मार्टफोनच्या या जगामध्ये डिजिटल पेमेंटची चलती आहे. भारताचा स्मार्टफोन धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच वेगाने डिजिटल पेमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आणि वापरा सुद्धा वाढ होत आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑनलाइन पेमेंटचे प्रस्त वाढत आहे. यामुळे एक भारताने अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. डिजिटल पेमेंटच्या या व्यवहारांमध्ये भारताने अमेरिका आणि चीन या दिग्गजांना सुद्धा मागे टाकले आहे. भारताने ऑनलाइन पेमेंटच्या व्यवहारामध्ये वाढ करून या दोन देशांना मात दिले आहे.
एका रिपोर्टनसार भारताच्या ऑनलाईन पेमेंट प्रणालीने चीनच्या आली पे आणि अमेरिकेच्या पे पाल या कंपन्यांना टक्कर देत त्यांच्यावर मात केली आहे. जैकमा हे अली पे चे सर्वेसर्वा किंवा मालक आहेत. आणि पे पाल अमेरिकेतील ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंट या स्वरूपातील मोठी कंपनी मानले जात आहे.
भारताच्या यूपीआय प्रणालीचा विचार करायचा झाल्यास भारतामध्ये त्याचा सर्रास वापर होत आहे. एप्रिल ते जुलै च्या दरम्यान भारतामध्ये 81 लाख कोटी रुपये द्वितीयाच्या माध्यमातून व्यवहार झाले आहे. देवाण-घेवाण जगातील सर्वात मोठी देवाण-घेवाण मानली जात आहे. एका सर्वेचा रिपोर्टनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या देवांमध्ये 37% ने वाढ नोंदवण्यात आले आहे. सर्वेनुसार या यूपीआय प्रणालीवर एका सेकंदाला 3729 रुपयांची देवाण-घेवाण होत आहे. 2022 मध्ये हीच देवाण-घेवाण प्रति सेकंद 2348 रुपये एवढी. हिशोब करायचा झाला तर सध्या 53% यात वाढ नोंदवण्यात आली आहे.
एका रिपोर्टनुसार 2023 मध्ये जगभरामध्ये 117.6 मिलियन व्यवहार हे युपीआय पेमेंटच्या माध्यमातून झाले आहेत. सलग तीन महिने यूटीआय पेमेंट हे वीस लाख कोटी च आकड्याला पार झाले आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून भारत हा जागतिक स्तरावरचा सर्वोच्च देश बनला आहे. एका सर्वच्या माहितीनुसार भारतामध्ये 40% हे व्यवहार यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून होत असतात. येत्या दहा वर्षांमध्ये यूपीआय हे 100 मिलियन च्या पार होणार आहे. यूपीआय प्रणाली ही भारतासोबत संयुक्त अरब अमिरात आणि मलेशिया या देशांमध्ये सुरू झाली आहे.
यावरूनच असे लक्षात येईल येते की भारत हा डिजिटल पेमेंट मधील एक बॉस म्हणून उदयास येत आहे