कष्ट करणाऱ्याचे पैसे खाल्ले तर हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत -रामदास कदम

कष्ट करणाऱ्याचे पैसे खाल्ले तर हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत -रामदास कदम

जसं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तससे राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक कार्यक्रमातून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. यातूनच त्यांच्या पोटातलं ओठावर येऊ लागल्याचे बोलले जात आहे.

असे त्याचे एका कार्यक्रमांमध्ये शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी एक वक्तव्य केले असून जळगाव मध्ये  कृतज्ञता सोहळ्यामध्ये बोलताना रामदास कदम यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. निमित्त होतं हातपंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनाच्या वतीने ठेवण्यात आलेला सत्कार सोहळा. हा सोहळा जळगाव मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये रामदास कदम हे प्रमुख पाहुणे बोलत होते.

पुढे त्यांनी अर्थ खात्यावर देखील ताशेरे ओढल असून, अर्थ खात्यासारखं नालायक खातात दुसरं नाही असं देखील वक्तव्य त्यांनी केले आहे. दहा वेळा मोबाईल माघारी यायची परंतु आम्ही घेतलेल्या फॉल ऑफ मुळे काम झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन ते अडीच महिन्यात येणाऱ्या विघ्नासाठी आम्हाला मदत करा असे त्यांनी निवडणुकीचा अप्रत्यक्ष नाव न घेता आवाहन केले. इतरांना सुद्धा आमच्याकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त करा असेही पुढे निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना त्यांनी म्हटले.

या दरम्यान त्यांचा सत्कार शाल घालून करण्यात सत्कारात वापरलेल्या शालीचे उदाहरण देत ते पुढे म्हणाले की आज सत्काराच्या निमित्ताने जी शाल तुम्ही मला दिली तिची उब कधीही विसरणार नाही. ही शाल मला विरोधकांची थंडी कधीही वाजू देणार नाही असेही सत्कार करणाऱ्यांचे कौतुक करताना रामदास कदम यांनी वक्तव्य केले.

पुढे ते म्हणाले की मला कोणतेही गोष्ट न मागता मिळते उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणीपुरवठा मंत्री होतो मी ते मागितले नव्हते तरी ते मला मिळाले. मला न मागता सगळे मिळते. असेही त्यांनी म्हटले. आणि मिळालेल्या गोष्टींमध्ये मी नेहमी समाधानी किंवा समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पुढे म्हटले की वडील हे काँग्रेस पक्षाचे प्रचार करत असताना ते बाळासाहेबांच्या सेनेचा प्रचार करत असताना विजय झाल्याचे त्यांनी सांगितले. गरीबी मी जवळून पाहिले असल्यामुळे गरीबी काय असते आणि गोरगरिबांचे पैसे खाल्यानंतर काय होते, गोरगरिबांचे पैसे खाल्ले तर हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत असेही विचार त्यांनी मांडले.

 

Leave a Comment