काँग्रेसचा मेगा प्लान तयार राहुल आणि प्रियंका महाराष्ट्र मध्ये सभांचा धडाका उडवणार
महाराष्ट्र मध्ये जसा निवडणुका येईल तस तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते महाराष्ट्र मध्ये निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी येत असून भाजपाचे जेपी नड्डा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्र मधील महायुती मधील जागावाटपाबाबत आढावा घेतला आहे.
महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या निवडणूक मध्ये भाजपाचे झालेले पीछेहाट याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देखील तयार आहेत. महाराष्ट्र विधानसभेवर काँग्रेसचे विशेष लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणूक मध्ये मिळालेल्या यशाने काँग्रेसचे नेते विधानसभेमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवण्यासाठी तयार असलेले दिसत आहेत.
राज्यात काँग्रेस कडे मेगा प्लान तयार केला आहे.कांग्रेस चे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे प्रमुख नेते महाराष्ट्रात तळ ठोकून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.या दोन नेत्यांच्या जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात होणार आहेत.तसेच इतर नेते सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष ठेवून असणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका गांधी राहुल गांधी यांच्या सभांचा धडाका उडणार आहे. या दोन्ही त्यांची मिळून 15 ते 20 सभा महाराष्ट्रात होणार असून प्रत्येक विभागात त्यांची सभा होणार आहे. यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेत्यांची देखील महाराष्ट्रात सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसने ते विजय वडेट्टीवर यांनी काँग्रेसच्या इतर नेते बाबत झालेल्या बैठकीमध्ये ही माहिती दिली आहे. तसेच राज्यातील इतर परिस्थिती बाबत सुद्धा इतर नेत्यांना माहिती दिल्याचे कळत आहे.
विजय वडेट्टीवार यांनी जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सुद्धा टीका केली असून महाराष्ट्रात भाजपा 50 60 च्या पुढे जाणार नसल्याचे भाकीत सुद्धा केले आहे
महत्त्वाच्या बातम्या
आनंद आश्रमातील घटनेवरून संजय राऊत संतापले, आनंद दिघे असते तर..
एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अनंत चतुर्दशी झाल्यानंतर होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
हिंजवडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या. पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप