काँग्रेसची सत्ता आल्यास महालक्ष्मी योजना आणणार-प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर माजी लाडकी बहीण योजना चालू केली असून त्या मार्फत 21 ते 65 वयोगटातील महिलांना मासिक दीड हजार रुपये बँक अकाउंट वर जमा होत असतात.. आतापर्यंत दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अशी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
माहितीची ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरत असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुसरी योजना जाहीर केली आहे त्यांनी महालक्ष्मी या योजनेची घोषणा केली असून ही योजना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या तोडीस तोड असेल असे त्यांचे म्हणणे आहे. पुढे त असेही म्हणाले की ती गरज पर्यंत पोहोचवण्यात यावी तळागाळापर्यंत पोहोचावी त्याबाबत माहिती सरकारने त्याकडे लक्ष द्यावे.
जर काँग्रेसचे सरकार आले तर काँग्रेस सरकार महालक्ष्मी योजना आणून महिलांना दर महिन्यात तीन हजार रुपये देण्याचे वचन त्यांनी दिले. आणि ह्या योजनेमार्फत प्रतिवर्षी एक हजार रुपयांची वाढ देखील होत राहील अशी देखील घोषणा त्यांनी यानिमित्ताने केली.
विरोधकावर टीका सोडते म्हणाले की योजना इलेक्शन पुरती नसावी ती योजना कायम असावी ही योजना फसवी असू नये नये. योजनेचे पैसे आले की ते बँक वाल्यांस गायब केले असे असू नये म्हणत त्यांनी विरोधकां वर ताशेरे ओढले.
माहिती सरकारने मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा इव्हेंट केला असून या इव्हेंटचा महिलांना खूप त्रास होत आहे असे देखील त्यांनी आरोप केला आहे. काँग्रेस सरकार आल्यास यापेक्षाही चांगली योजना आणण्याची ग्वाही त्यांनी दिली. महालक्ष्मी योजना नावाने असणारी योजनाही प्रतिवर्षी या योजनेमध्ये वाढ करण्यात येईल. ही योजना फसवी नसून यामधून महिलांना कोणताही त्रास होणार नाही याचा विचार देखील करण्यात येईल. परंतु माहिती सरकार मध्ये बँकेत गेल्यानंतर महिलांना किती त्रास होतोय याकडे सफ डोळेझाक केले जात आहे. असा आरोप देखील त्यांनी केला.
महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना एक मदतीचा हात म्हणून 3000 ची मदत देण्यात येईल. ती ती मासिक स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. या योजनेमध्ये प्रतिवर्षी हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे.