चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक काय आहे नेमकं प्रकरण
आपल्या रील्सद्वारे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे आणि उपदेशाचे डोस पाजणारे चैतन्य महाराज वाडेकर सगळ्यांनाच माहित आहेत. या चैतन्य महाराजांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर बनवून संत बनू पाहणाऱ्या चैतन्य महाराजांनी प्रताप केला असं यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या या अटकेमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
प्रकरण काय आहे ते या माध्यमातून जाणून घेऊया. चैतन्य महाराज वाडेकर आणि तीन भाऊ आणि इतर साथीदारांसह खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडून टाकले आहे. चैतन्य महाराज हे चाकण एमआयडीसी हद्दीत येथे वास्तव्यास असून तिथेच एका बिल्डर सोबत त्यांचे वादविवाद सुरू असून, जमिनीचा वाद असल्याचे सांगितले जाते. एका बिल्डरने घरा लगतची जागा विकसित केली असून तिथे एक कंपनी उभारण्यात येत आहे.
परंतु चैतन्य महाराज वाडेकर यांनी या बिल्डरवर आरोप केला असून त्याने माझ्या खाजगी जागेतून रस्ता केला असून तसेच कंपाउंड देखील माझ्या जागेत केले आहे असे सांगितले. या वादामुळे चैतन्य महाराजांनी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वारंवार केली आहे. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले असताना त्याचा निकाल चैतन्य महाराजांच्या बाजूने लागला सरकारी मोजणी ला मान्यता मिळाली.
मात्र संबंधित जागा ही वाडेकरांच्या मालकीची आहे यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आणि अनिवार्य होतं. परंतु त्यांनी रात्री मध्ये भावांना बोलावून आणि इतर साथीदारांसह जेसीबी मागवला आणि कंपनीकडे जाणारा रस्ता उकडून टाकला आणि कंपाऊंड तोडून टाकले. हे प्रकरण आता महाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये गेले आहे.
परंतु स्वतःला महाराज म्हणून घेणारे आणि स्वतःला संत समजणारे चैतन्य महाराजांनी हा अतातायीपणा कसा केला हा प्रश्न पोलिसांना पडला. चैतन्य महाराजांना रस्ता उखडून टाकून कायदा हातात घेतला आणि चूक मान्य करायचे सोडून पोलिसांनाच उपदेशाचे डोस पाजण्यास सुरुवात केली.
परंतु पोलिसांनी सुरुवातीला सबुरीने घेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेत असणाऱ्या चैतन्य महाराजांनी न ऐकण्याची भूमिका ठेवली . नंतर पोलिसांनी ना इलाजाने कायदा दाखवत त्यांना कायद्याचे स्मरण करून दिले. त्यानंतर हळूहळू चैतन्य महाराजांनी आपली चूक मान्य करायला सुरुवात केली.
अशाप्रकारे तीन भावासह आणि इतर साथीदारसह पोलिसांनी अटक केली असून जेसीबी देखील ताब्यात घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Big News महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग झाली सुरू, किती आहे त्याची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये
Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी
Nilesh Rane निलेश राणे 19 वर्षानंतर शिवसेनेमध्ये परतणार का?