तुम्ही जिथे बसलात हे तर आमचेच पाप आहे,.. उद्धव ठाकरे यांची सभेमध्ये जोरदार हल्लाबोल
मुंबई- मुंबई येथे झालेल्या वज्र निर्धार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील स्वराज्यासाठी सुरत लुटली होती परंतु हे दोन्ही गुजरातचे ठग महाराष्ट्र लुटत आहेत. आणि या लुटीचा पैसा जाहिरात करण्यासाठी वापरत आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की या देशासाठी बलिदान करताना अनेक जण होऊन गेले आजही आहेत ते कोणत्या धर्माचे किंवा जातीचे नाहीत ते आमचे आहेत. आणि हेच आमचे हिंदुत्व आहे. लोकसभेच्या निवडणुकी वेळी माझ्या असे लक्षात आले की हिंदुत्वाचा बोगस बुरखा घालून या देशाचे संविधान बदलू पाहत आहेत.
मी माझ्या भाषणाची सुरुवात तमाम देश बांधवांनो केली होती परंतु ते देखील त्यांना पटलेले नाही. त्यावर देखील त्यांनी टीका केली असून, देशभक्ता हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या सर्व जाती धर्माचे लोक येतात. जो महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी माझ्याबरोबर येतो तो मग कुठल्याही धर्माचा असेल तरी तो माझा आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
माझा आणि तुमचा स्वार्थ एवढाच आहे की पुढच्या दोन पिढ्या या दोन महा ठगांच्या गुलामगिरीत जगू देणार नाही. आम्ही गुलामगिरी कधीच करणार नाही. हिंदुत्व हिंदुत्व आहे काही काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. मला शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नसून आणि हे वाक्य माझे नसून मळणे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
मी आजही सर्वांच्या साक्षीने सांगतो आज कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आज मी त्याला जाहीर पाठिंबा देण्यात तयार आहे. मला मुख्यमंत्री पद प्यारे नाही.मला महाराष्ट्र प्यारा आहे. मुख्यमंत्री होईल आणि मी पुन्हा येईन मी पुन्हा ही अशी मला स्वप्न कधीच पडत नाही आणि मला महाराष्ट्र वाचवायचा आहे आणि ते वाचण्यासाठी मला काही करायला लागले तर तयार आहे अशी देखील गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
राज्यात दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागू होणार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा इशारा
हरियाणा आणि जम्मू काश्मीर चा कौल कुणाला मिळणार.. आज होणार फैसला
तुतारी’ हातात घेताच हर्षवर्धन पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट