त्यांना अजित दादा हे सत्य नको आहेत- जयंत पाटील

त्यांना अजित दादा हे सत्य नको आहेत- जयंत पाटील

त्यांना अजित दादा हे सत्तेत नको आहेत असं विधान शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. महायुती मधील पक्षातील नेत्यांचा गोंधळ पाहता असे विधान त्यांनी केले असावे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने असे विधान केल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आणि चर्चेचे वातावरण तयार झाले आहे.

मध्यंतरी जळगाव मधील सभेमध्ये गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी  अर्थ खात्याबद्दल नालायक असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पाणीपुरवठा खात्याकडील पाठवलेले फाईल दहा वेळा नाम मंजूर होऊन आली होती असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. परंतु अर्थ खात हे सर्वात नालायक खत असल्यामुळे मी ही पाठपुरावा सोडला नाही आणि फाईल मंजूरच करून घेतली असे देखील गुलाबराव पाटील बोलले होते.

सध्या अर्थ खात हे अजितदादा कडे असून त्यांच्या खात्याला नालायक खाते म्हणून बोलणे याचा उद्देश नेमका काय आहे असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी केला होता. त्यांना अजित दादांना महायुती मधून बाहेर तर काढायचे नाही ना असा प्रश्न देखील जयंतराव पाटील यांनी उपस्थित केला.

सध्या महाराष्ट्र मधील लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजनेवरून देखील जयंत पाटील यांनी महायुतीला टोले मारले. माझं त्यांच्यासोबत अलीकडे काही बोलणं झालं नसून ते नाराज आहेत का असे देखील कळायला मार्ग नाही असे जयंत पाटील यांनी म्हटले. अजित दादांना महायुती मध्ये गुलाबी कॅम्पेन काढावा लागत आहे. एजन्सी अजित दादांन काय काय करावे लागतील  याचा पत्ता लागू शकणार नाही.

आता लोकांच्या मनातील सरकार येणार आहे असे देखील जयंत पाटील यांनी महायुतीला तिला उद्देशून म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेवरून श्रेय घेण्याचा जो महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे तो लोकांना फारसा आवडलेला नाही त्यामुळे लोकांना सुद्धा वाटते की महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार येऊ दे.

अजून बरेच लोक महा विकास आघाडीत येतील असा अंदाज देखील त्यांनी बांधला आहे.लाडकी बहिण योजना ही गोंधळलेली असून त्यांनी निवडणूकीसाठी ही योजना सुरू केली असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे मतदार सुद्धा नक्की महायुतीला निवडणुकीमध्ये झुकते माप देतील या शंका नाही

 

Leave a Comment