दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा, राजकारणामध्ये खळबळ
Arvind Kejriwal दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मध्य धोरण प्रकरणांमध्ये तुरुंगामध्ये होते दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर आज आपल्या पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्ते चे संवाद साधत असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनामाची घोषणा केली आहे त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसांमध्ये ते दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे राजीनामा राजीनामा सोपवणार असून. त्यांचा राजीनामा आहे राजकीय विश्वामध्ये एक खेळी असल्याचे मानले जात आहे.
मद्य धोरण प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. सचिवालय मध्ये जाणे सुद्धा मज्जाव करण्यात आला होता. मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेताना त्यांना नायब राज्यपालांची परवानगी घ्यावी लागत होती असे न्यायालयाने त्यांना सांगितले होते. राजीनामा देऊन थेट जनतेमध्ये जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
त्यानंतर त्यांनी असे म्हटले की मी आणि मनीष सिसोदिया आम्ही दोघेजण जनतेमध्ये जाऊन प्रत्येक गल्लीत पूर्ण दिल्लीमध्ये जाऊन जनतेशी चर्चा करून जर माझी खरी चूक असेल तर मला पुन्हा निवडून देऊ नका असेही सांगणार आहोत. मी इमानदार असेल तरच माझी मदत करा किंवा मी बेमानी असेल तर मला पुन्हा मत देऊ नका असे मी जनतेला आव्हान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांमध्ये मी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये दुसरा नेता मुख्यमंत्रीपदी बसणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले. त्याने पुढे म्हटले की माता सीतेला सुद्धा वनवासातून आल्यानंतर अग्नी परीक्षा द्यावी लागली होती तशीच मी सध्या अग्नि परिषदेत असून, फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका होणार असून मी एक मागणी करतोय या निवडणुका महाराष्ट्र बरोबर नोव्हेंबरमध्ये घ्याव्या. त्यानंतर जनतेचा जो निर्णय येईल तो मी मान्य करेल असे देखील त्यांनी सांगितले.
केजरीवाल यांच्या राजीनामा नंतर कार्यकर्त्यांमध्ये कोणती प्रतिक्रिया उमटते हे पाहणे देखील औत्सुक्याचे आहे.
महत्वाच्या बातम्या
भारताच्या निर्णयाने पाकिस्तानी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले.