देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या राशीवर करणार कृपा वर्षाव

देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या राशीवर करणार कृपा वर्षाव

आज दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी अश्विन शुक्ल पक्षातील तिथी चतुर्थी आहे. चतुर्थी तिथेही सकाळी 9:48 पर्यंत असून त्यानंतर पंचमी तिथी सुरू होणार आहे. घटस्थापनेपासून नवरात्रीचा आज पाचवा दिवस असून आज देवी स्कंद मातेची पूजा केली जाते. याच बरोबर आज ललिता पंचमी असून या दिवशी ललिता पंचमीचे वृत्त करताना कुमारिकांचे सुद्धा पूजन केले जाते.

आजचा नवरात्रीचा पाचवा दिवस हा मीन पासून मेष राशी यांना कसा असणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. नवरात्रीच्या काळामध्ये माता अंबाबाईच्या आशीर्वादाने कोणकोणत्या राशींना सुखाचे दिवस असणार आहेत ते आपण पाहूयात.

पहिली मेष रास

तुमच्या जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करावी लागेल. आपण कोणाकडून फसले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल तसेच व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाने चिकाटी सोडू नये. तुमची आध्यात्मिक आवड वाढीस लागू शकते.

वृषभ रास 

आज या राशींच्या लोकांच्या घरामध्ये धार्मिक कार्य घडून येईल आणि पूजा अर्चेमध्ये तुमचे मन रमेल. आपल्या कामांमध्ये मन शांत ठेवून काम करण्याची सवय लावून घ्या. कार्यालयीन कामांमध्ये सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

तुम्ही केलेली उपासना आज सफल होण्याचा दिवस आहे. केलेल्या मेहनतीचे फळ नक्की मिळणार आहे. तुमचा दिवस अत्यंत उत्तम जाणार आहे. नोकरी पेशा वर्गाला चांगली बातमी होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला यामध्ये फायदा दिसून येईल. तुम्ही आज भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. आजचा दिवस तुम्हाला अत्यंत व्यस्त स्वरूपाचा असेल. समोरच्या माणसांच्या चुका काढत बसू नका.

सिंह रास

या राशींच्या घरांमध्ये आज सुख-समृद्धी येईल. नवीन क्षेत्रातील नोकरीचे संधी चालून येतील. आज तुम्ही मनासारख्या गोष्टी किंवा वस्तू खरेदी करू शकाल. आपल्या व्यक्तिमत्वाने आपल्या कौशल्याने इतरावर छाप पाडण्याचा दिवस असेल.

कन्या रास

तुम्ही केलेल्या कष्टाला आणि तुमच्या प्रयत्नांना आज यश येणार आहे. आज तुम्हाला प्रवासाची योग बनत आहेत. नवरात्रीमध्ये तुमच्या वरील सर्व संकटांचे निरसन होईल. तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून मोठा धन लाभाची सुद्धा शक्यता आहे.

तुळ रास

तुम्हाला आज खर्चावर  नियंत्रण ठेवावे लागेल. आज तुमचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टींमध्ये सावधानता बाळगावी. आज मित्रांचे सहकार्य करावे लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होण्याचा दिवस आहे.

वृश्चिक रास

आज तुम्हाला वाद विवादाला सामोरे जावे राहण्याची शक्यता असते आणि तुम्ही मन शांत ठेवावे लागेल. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. आज आपले विचार समोर मांडाल.

धनु रास

आज कुटुंबासह मिळत आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा प्रसन्न असेल आज तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

मकर रास

आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आपण घेतलेली  व्यावसायिक निर्णय ही भविष्यात फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

जे लोक व्यवसाय करतात त्यांना चांगले दिवस येणार आहेत. तसेच ज्या लोकांना नोकरीची अपेक्षा असेल त्यांना सुद्धा नोकरीचा कॉल येण्याची शक्यता आहे. आज प्रवासाचा सुद्धा योग असणारा असून आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन रास

नवीन नवीन संधी चालून येऊ शकतात. आज तुम्हाला जवळचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आज तुमचे मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही धार्मिक क्षेत्राला भेट द्या. त्यामुळे मन प्रसन्न होईल.

महत्वाच्या बातम्या

बिग बॉस विजेता सुरज चव्हाण ला मिळाला 14 लाखाचा चेक आणि एक चित्रपट

आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणने विषयी राहुल गांधींच्या कोल्हापूरमध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा

महायुतीला आणखी एक धक्का बसणार? बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

 

 

Leave a Comment