पुण्यात गणेशोत्सव निमित्ताने प्रशासनाकडून खबरदारी दहा दिवस तुम्हाला दारू मिळणार नाही

पुण्यात गणेशोत्सव निमित्ताने प्रशासनाकडून खबरदारी दहा दिवस तुम्हाला दारू मिळणार नाही

Pune Ganpati utsav लहान पासून ते मोठ्या पर्यंत अतिशय प्रिय असलेल्या भगवान श्री गणेशाचे आगमन सात सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तीभावाने संपूर्ण देशामध्ये केले जाईल. महाराष्ट्र राज्यातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे पुण्यात (Pune)सुद्धा अनेक मानाचे गणपती आपल्या भव्य अशा आगमन मिरवणुकीनंतर गणेशोत्सवाची स्थापना करतील.

हाच गणेशोत्सव अतिशय शांततेने पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून अत्यंत खबरदारीचे उपाय योजन्यात आले आहेत. गणेश उत्सवाच्या काळामध्ये अर्थात सात 17 आणि 18 सप्टेंबर या दिवशी दारू विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. तर विशेषता विश्रामबाग ,खडकी आणि फरासखाना कधी भागामध्ये दारू विक्रीसाठी दहा दिवसांची बंदी घालण्यात आलेली आहे.

श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन कोणीही म्हणूनच प्रकार करू नये किंवा नये यासाठी सर्वांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यासाठी मंडळाने सीसीटीव्हीची असे पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आले आहेत. तसेच शहरामध्ये पूर्ण गर्दीच्या ठिकाणी तेराशे 56 सीसीटीव्ही पोलीस प्रशासनाकडून बसवले आहेत

गणेशोत्सव काळात पोलीस विविध अधिकाऱ्यांची. नेमणूक केलेली आहे. गणेशोत्सव काळातील बंदोबस्तासाठी चार अप्पर पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, 23 सहाय्यक पोलीस आयुक्त, 128 पोलीस निरीक्षक, 568 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4604 पोलीस कर्मचारी आणि अकराशे होमगार्ड इत्यादी फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जोडीला केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणि शीघ्र कृती दलाच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आला आहेत.

यामुळे गणेशोत्सव काळामध्ये सर्वांनी शांततेमध्ये उत्सव साजरा करून कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडन करण्यात आले आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या सूचनेचे सर्वांनी पालन करण्याचे देखील सांगितले गेले आहे.

 

 

Leave a Comment