बिग बॉस विजेता सुरज चव्हाण ला मिळाला 14 लाखाचा चेक आणि एक चित्रपट
सुरज चव्हाण: गेले 70 दिवस चाललेले बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व अखेर संपलेले आहे. शेवटी तितकाच धमाकेदार झालेला असून या पाचव्या पर्वाचा विजेता महाराष्ट्राचा लाडका रील स्टार सुरज चव्हाण झालेला आहे. अत्यंत साधेपणाने राहणारा सुरज चव्हाणला बिग बॉस गेम कळत नाही अशी टीका वारंवार होत होती परंतु त्याने सर्वांची बोलती बंद केले असून बिग बॉसच्या ट्रॉफी वर आपले नाव कोरले आहे.
सुरुवातीला बिग बॉसच्या घरामध्ये तो येण्यास इच्छुक नव्हता परंतु त्याच्या बिग बॉस च्या टीमने गावी जाऊन त्याची समजूत काढली आणि त्याला बिग बॉसच्या घरामध्ये येण्यास सांगितले. मूळचा बारामतीचा असणारा सुरज चव्हाण याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि प्रेम दिले.
एका सामान्य कुटुंबातील मुलाने हे यश मिळवले आहे.बिग बॉसच्या घरात नेमकं काय टास्क असतात हे सुद्धा न करणारा साधा माणूस बिग बॉस विजेता झाला.अंकिता आणि पंढरीनाथ कांबळे त्याला समजून सांगत असत. पॅडी आणि सुरज चव्हाण यांची मैत्री प्रचंड लोकप्रिय झाली.
लहानपणीच आईवडील गेल्या नंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला आहे.सुरज चव्हाण ने शिक्षण सुद्धा घेतले नाही. अनंत अडचणीवर मात करून सुरज चव्हाण यांनी यश मिळवले आहे.
बिग बॉस चा विजेता झाल्यानंतर सुरज चव्हाण यांना माध्यमांची संवाद साधताना सांगितले की माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी आधीच सांगितले होते की बिग बॉस ची ट्रॉफी मी जिंकणार आणि ती जिंकल्याचा मला प्रचंड अभिमान आहे आता ही ट्रॉफी झापुक झुपूक पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार आहे. ती आता खरं ठरलं आहे आता पॅटर्न एकदम वेगळा आहे गुलीगत पॅटर्न.. बुक्कीत टेंगुळ
बिग बॉस चा विजेता ठेवल्यानंतर सुरज चव्हाण ला 14 लाखाचा चेक मिळाला असून त्यानंतर कार्यक्रमाचे स्पॉन्सर पू.ना. गाडगीळ यांच्याकडून दहा लाख रुपयांचे बक्षीस तसेच एक इलेक्ट्रिक बाइक देखील देण्यात आली आहे. या जिंकलेले पैशातून मी एक घर बांधणार असून त्याला बिग बॉस हे नाव देणार असल्याचे सुरज चव्हाण यांनी सांगितले.
स्पर्धेतील अंतिम फेरीतील खेळाडू अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, आणि विकी तांबोळी यांना प्रत्येकी एक एक लाख रुपये चेकच्या माध्यमातून बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. मात्र जान्हवी किल्लेकर यांनी अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी बाहेर पडून नऊ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळवले आहेत.
याचबरोबर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरज चव्हाण यांना घेऊन झापुक झुपूक या चित्रपटाची घोषणा केलेली आहे. अशा रीतीने सुरज चव्हाण हे नाव सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणने विषयी राहुल गांधींच्या कोल्हापूरमध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा
पाच वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न वाढणार,2000 ची वाढ होणार.
महायुतीला आणखी एक धक्का बसणार? बडा नेता शरद पवारांच्या गळाला?