भाजपा आणि अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता

भाजपा आणि अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती सोबत राहिलेले काही नेते विधानसभा निवडणूक दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. या नेत्यांमध्ये अकलूज चे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांतराव परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्याचे बापू पठारे, कागलचे समरजीत सिंह घाटगे यांच्या हालचाली वाढलेले आहेत. ते कधीही पक्षप्रवेशाची घोषणा करू शकतात.

महायुती मधील बरेच नेते विधानसभा निवडणुकीमधील संभाव्य उमेदवारीसाठी महाविकास आघाडीला मिळण्याची दाट शक्यता आहे.

शरद पवार गटामध्ये सामील होणाऱ्या पैकी नेत्या विषयी बोलायचे झाले तर माढा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले रणजीत सिंह मोहिते पाटील हे माहिती मधील कधीही बाहेर पडू शकतात. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेसाठी गुप्तपणे मदत केली असल्याचे उघड झाले आहे.

माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सातत्याने शरद पवार गटाशी संपर्कात आहेत. ती सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये आहेत. त्यांचा मुलगा हा तू तर या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतो. यांच्या घर वापसीवर शरद पवार कधीही निर्णय घेऊ शकतात.

गेल्या सहा वर्षापासून विधान परिषदेचे आमदार असलेले पंढरपूरचे प्रशांतराव परिचारक हे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात लढू शकतात.

सांगोला विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार शहजी बापू पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांची उमेदवारी माहिती मधून निश्चित मानली जाते. त्यांच्याविरोधात अभिजीत पाटील देखील उमेदवारी मागू शकतात जे की सध्या लोकसभेपूर्वी महायुतीमध्ये गेले आहेत ते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात.

सातारा येथील वाई खंडाळा येथील माजी आमदार मदन भोसले यांनी जयंत पाटलाची भेट घेतली आहे.ते मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात.

गेले काही वर्षापासून बीजेपी सोबत असणारे पुणे मतदारसंघाचे हर्षवर्धन पाटील सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ते विद्यमान आमदार अजितदादा पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर होते की नाही याची वाट पाहत आहेत. ही जागा जर अजितदादा पवार गटाला गेली तर हर्षवर्धन पाटील हे अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढव शकतात.

कोल्हापूर मधील कागल मधून समरजीत घाटगे यांनी बीजेपी सोडल्यानंतर कोल्हापूर भाजपा अध्यक्ष राहुल देसाई सुद्धा काँग्रेसमध्ये परत येण्याची संकेत देत आहेत. त्यांनी कोल्हापूर भुदरगड विधानसभा उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपचा जिल्हा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

खरंतर हे पुढारी आपले राजकीय पत्ते गुलदस्त ठेवत आहेत. योग्य वेळेचा किंवा योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत.

 

Leave a Comment