मराठा समाजाला दगा फटका करू नका म्हणून मुख्यमंत्र्यांना इशारा 

मराठा समाजाला दगा फटका करू नका म्हणून मुख्यमंत्र्यांना इशारा

गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न अनु उत्तरितच आहे. मराठा मोर्चा चे प्रमुख म्हणून जरांगे पाटील यांनी हा लढा उभारला असून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर तोडगा निघावा यासाठी सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्यावर पावले उचलली जात असल्याचे कळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने ही पावले उचलल्याचं समजत आहे. तू म्हणून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे की मुख्यमंत्र्यांनी यात काही दगा फटका करू नये कारण माझ्या मते मराठा आरक्षण हे मुख्यमंत्री देऊ शकतात यात जर दगा फटका झाला तर मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या दृष्टीने त्यांच्या नजरेतून उतरतील.

मनोज जरांगे पाटील यांनी असे म्हटले की हैदराबाद गॅजेट लागू करा ही मागणी एक वर्षांपूर्वीची आहे. खरंच सरकार हैदराबाद गॅजेट लागू करत असेल तर हा विजय माझा नसून मराठा समाजाचाच असणार आहे. ही मागणी आजची नाही सरकारने सगे सोयऱ्याचे देखील अंमलबजावणी केली पाहिजे असे देखील म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देताना म्हटले की अजिबात कोणाचे हे ऐकून दगा फटका करू नका. अजिबात खेळ चालू करू नका. त्यांचा रोष हा संभाजी नगरचे पालकमंत्री आणि खासदारावर आहे.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मराठा समाज मानत आहे. पण तू त्या दोघां तिघांचं ऐकून काही दगा फटका करू नका नाहीतर तुम्ही मराठा समाजाच्या मनातून आणि माझ्याही मनातून उतर चाल असा इशारा देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यांनी पुढे असे म्हटले की काही लोकांच्या मनात समाजाच्या विरोधात गेम करण्याचा प्रयत्न आहे. तिन्ही  गॅजेट्स लागू करा अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

हैदराबाद गॅजेट लागू झाली तर मराठा समाजाचा नक्कीच फायदा होणार आहे. आंदोलने ही लोकशाहीने दिलेला अधिकार असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे देखील म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पितृपक्षामध्ये नवीन वस्तूंची खरेदी का करू नये ही आहेत कारणे

सावत्र आईचे क्रूर कृत्य अंथरणामध्ये लघुशंका केली म्हणून मुलीला दिले चटके 

मोठी बातमी पुण्यात सुरू होणार दोन वंदे भारत ट्रेन

 

Leave a Comment