मला मुख्यमंत्री व्हायचं नाही- उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
महाराष्ट्र राजकारणामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असून दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. महा विकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले होते की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. परंतु शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मुख्यमंत्री हा निवडणूक झाल्यानंतर ठरवण्यात येईल असे शरद पवार यांनी सांगितले होते.
शरद पवार यांनी सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका झाली होती. आधी महायुतीचे सरकार सत्तेतून बाहेर खेचण्याचे उद्देश महाविकास आघाडीचा आहे असे नेत्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु आता उद्धव ठाकरे यांनी या वादावर पडदा टाकत मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
जुन्या पेन्शन साठी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मी सर्वात आधी जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे त्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीला निवडून द्या. आता सरकार हे माझं ऐकून आता सरकार घोषणा देखील करेल परंतु त्याला तुम्ही बोलू नका. ज्यांना मी कुटुंब प्रमाणे मानत होतो त्यांनी सुद्धा आम्हाला फसवलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या कोणत्याही योजनेला बळी पडू नका.
हे सरकार आता इतिहास जमा होणार आहे आणि लवकर सत्य पण पायउतार होईल त्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर जुने पेन्शन योजना लागू करून असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये दिले. आणि पेन्शन साठी उपोषण वगैरे करू नका याचा काहीही या सरकारला फरक पडणार नाही आपले सरकार आले की ही योजना लागू करू असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
इंजिनिअरची रताळ्याची शेती यशस्वी, कमी झाली 6.5 लाख रुपये
रिटायरमेंट नियोजन करताना या पाच चुका कधी करू नका, नाहीतर अडचण होणार
या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे, यांना खड्यासारखे बाहेर काढा- शरद पवार