महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदाची बातमी, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2500 नवीन बसेस दाखल होणार

महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदाची बातमी, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2500 नवीन बसेस दाखल होणार

राज्य परिवहन महामंडळाची एसटी म्हणजेच ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी समजली जाते. ग्रामीण भागातील प्रवासासाठी लोकांचा आधार म्हणून या एसटीला म्हणजेच लाल परीला ओळखले जाते. ग्रामीण भागामध्ये अगदी खेडोपाडी लाल परीचे जाळे विस्तारलेले आहे. दररोज ला खूप प्रवासी या एसटी द्वारे प्रवास करत असतात. याच लोकांसाठी एक आनंदाची बातमी असेल परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य परिवहन आघाडी नवीन अडीच हजार डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे ही सुखकर होणार आहे. काही दिवसातच याची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल आणि पुढच्या वर्षी या गाड्या एसटीच्या ताब्यात दाखल होतील.

एसटी महामंडळाला नेहमी नफ्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यात येत आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 200 कोटी वसूल करण्यात आले आहेत. पुढच्या सहा महिन्यात सुद्धा याच्या एवढे उत्पन्न अपेक्षित असून सध्या एसटीच्या खात्यामध्ये 14000 गाड्या आहेत. त्यापैकी पाच हजार गाड्या ह्या एलएनजी मध्ये आणि 1000 गाड्या सीएनजी मध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील जनतेने आणि ग्रामीण भागातील प्रवाशाला ये जा करण्यासाठी त्यांचा प्रवास सोयीचा होण्यासाठी नवीन गाड्या दाखल होत आहेत. तसेच पुणे महामार्गावर धावणारी शिवनेरी बसेस मध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्यात आलेल्या आहेत. या प्रवाशांच्या सोयीसाठी असणार आहेत आणि याचा अधिभार कोणत्याही प्रवासाच्या तिकिटावर लावण्यात येणार नाही.

त्याचबरोबर बचत गटांना आपल्या विविध वस्तू विक्रीसाठी एस टी महामंडळाच्या बसस्थानकावर दहा बाय दहा चा स्टॉल  उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आदिवासी बहुल प्रदेश असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे एसटी महामंडळाच्या नवीन आगारांची निर्मिती करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या राशीवर करणार कृपा वर्षाव

बिग बॉस विजेता सुरज चव्हाण ला मिळाला 14 लाखाचा चेक आणि एक चित्रपट

आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणने विषयी राहुल गांधींच्या कोल्हापूरमध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा

Leave a Comment