मोठी घोषणा , अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव बदललं हे असं नवीन नाव..

मोठी घोषणा , अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव बदललं हे असं नवीन नाव..

केंद्र सरकारने अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे राजधानीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटर द्वारे ही माहिती दिली आहे. पूर्वी अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव कोर्ट ब्लेअर हे होते आता नवीन नाव हे श्री विजयपूरम हे असेल अशी माहिती अमित शहा यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

पोर्ट ब्लेअर हे नाव स्वातंत्र्य पूर्वीचे नाव असून ते गुलामगिरीचे प्रतीक असल्याने या शहराचे नाव बदलण्यात आले आहे असे श्री. अमित शहा यांनी म्हटले आहे. गुलामगिरीच्या कोणत्याही खुणा ठेवायचा नाहीत त्या पुसून टाकायच्या आहेत असे नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या संकल्पातूनच या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे अमित शहा यांनी सांगितले आहे.

माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव आता पोर्टबअर नसून ते श्री विजयपूरम असणार आहे. श्री विजय पुरम हे नाव आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाला दर्शवते. देशाचे स्वातंत्र्यसंग्रमात अंदमान निकोबार या बेटाचे योगदान अतुलनीय आहे असे देखील गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेआहे.

स्वातंत्र्यसेनानी माननीय सुभाष चंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा या अंदमान निकोबार या बेटावरच फडकावला होता अशी आठवण देखील अमित शहा यांनी करून दिली तसेच सेल्युलर जेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्य सेनानींनी स्वातंत्र साठी संघर्ष केलेल्यांची ही पवित्र भूमी असून ही भूमी संघर्षाची आहे असे देखील शहा यांनी म्हटले आहे. तसेच सध्या देशाच्या विकासाला आणि सुरक्षेला गती देण्याचं काम हे बेट करत आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी सुध्दा अनेक शहरांची नावे बदलली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

माझ्याकडे सुद्धा यादी तयार आहे 25 आमदार पाडणार 

लाडक्या बहिणी च्या लाभार्थीने डोकं लावून कमावले एवढे रुपये..

Maharashtra gov. आता लवकरच आईच्या नावाचा सातबारा निघणार स्त्री सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय

Leave a Comment