मोठी बातमी पुण्यात सुरू होणार दोन वंदे भारत ट्रेन
भारतीय रेल्वेने होण्यासाठी एक स्पेशल गिफ्ट दिले असून पुणे शहर साठी दोन वंदे भारत ट्रेन देण्यात येणार आहेत याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. याच धरतीवर पुणे ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेनची ट्रायल होणार असून ती सकाळी 11 वाजता होणार आहे. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी अकराच्या दरम्यान पुणे ते कोल्हापूर दरम्यानच्या अंतरामध्ये ट्रायल घेण्यात येणार आहे.
पुण्याचे प्रवासी आणि मुंबई मधील प्रवासी यांचे अत्यंत खुशखबर असणार आहे पुणे ते मुंबई ही वंदे भारत ट्रेन येथे सोमवारपासून सुरू होणार आहे पुण्यात आतापर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नव्हती. मुंबईतून कोल्हापूरला जाणारी वंदे भारी ट्रेन सुद्धा पुण्यातूनच जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना सध्या दोन वंदे भारत ट्रेन चे गिफ्ट मिळाले आहे आणि मुंबईला सातवी वंदे भारत ट्रेन बहाल करण्यात आली आहे.
भारतामध्ये वंदे भारत ट्रेन ही फारच लोकप्रिय होत असून हिचा स्पीड हा सेमी स्पीड असल्याने ती विविध स्थानकावरून सुरुवात करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. पहिली पुणे ते सोलापूर वंदे भारत ट्रेन धावत आहे. ही ट्रेन मुंबई वरून सोलापूरला जात असल्यामुळे ती पुण्यावरून जाते आता 16 सप्टेंबर पासून मुंबई ते कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेन ही पुण्यातूनच जाणार आहे.
मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे आज ट्रायल होणार असून सोमवारपासून ती धावणार आहे. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी अशा दोन वंदे भारत ट्रेन पुण्याहून सुरू होत आहेत.
मुंबई टू कोल्हापूर ही वंदे भारत ट्रेन मुंबईहून धावणारी सातवी वंदे भारत ट्रेन असणार आहे. 518 किलोमीटर आंतर हे साडेदहा तासांमध्ये कापणार आहे. आठ डब्यांची ही वातानुकूलित ट्रेन आठवड्यातील सोमवार सोडून प्रत्येक दिवशी धावणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार कोसळणार ‘या’नेत्याचा दावा
राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-भाजप
नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लावला कोट्यावधींचा चुना शेतकऱ्यांची अजितदादांकडे कैफियत