या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे, यांना खड्यासारखे बाहेर काढा- शरद पवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी एकमेकांवर झडत असताना दिसत आहेत. नेते एकमेकावर आरोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंदखेडा येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी या भाजप सरकारवर तोफ डागली असून यांना सत्तेचा उन्माद चालला आहे यांना खड्यासारखे बाहेर काढावे लागेल असे कार्यकर्त्यांना बजावले.
या मेळाव्यातून त्यांनी भाषण करताना नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी धोरणावर टीकास्त्र सोडले असून मी दहा वर्ष कृषी खात्याचे काम केले असताना कृषी क्षेत्र स्वयंपूर्ण झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. आजच्या राजकारण्यांना शेतीबद्दल काहीही प्रेम वाटत नाही. शेती बद्दलची योग्य धोरणे ते राबवत नाहीत. कांद्याचे च उदाहरण घ्यायचे झाले तर कांदा निर्यात बंदी करून त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे असे देखील शरद पवार यांनी सांगितले.
तुम्ही जो माल पिकवता त्याच मालावर निर्यात निर्यात करण्यावर बंदी घातली तर शेतकरी कसा टिकेल असा टोला देखील शरद पवार यांनी भाजप सरकारला मारला आहे. मी कृषी मंत्री असताना शेतीमध्ये जे दहा वर्षे काम केले त्यामुळे भारत हा तांदूळ या पिकामध्ये स्वयंपूर्ण झाला होता. हे उदाहरण देखील पवार यांनी दिले.
याच मेळाव्यातून शरद पवार यांनी बोलताना तुम्ही बहिणींना दीड हजार रुपये दिले पण त्यांच्या सुरक्षेच्या काय? त्यांचे सुरक्षा सरकारने वाऱ्यावर सोडली आहे असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. धुळ्यातील सिंदखेडराजा शरद पवार यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या सरकारने सत्तेचा गैरवापर सुरू केला असून हे गुंडांचे सरकार असल्याचे देखील शरद पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
सत्तेतील या सरकारला सत्तेचा उन्माद चढला असून या सरकारला खड्यासारखे बाजूला केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमधून अधिकार दिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या सरकारला खाली खेचण्याचे काम या माध्यमातून तुम्हीच करावे लागेल असे देखील उपस्थित त्यांना पवार यांनी विनंती केली.
महत्त्वाच्या बातम्या
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा, राजकारणामध्ये खळबळ
भारताच्या निर्णयाने पाकिस्तानी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले.