राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-भाजप
राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये एका मुलाखतीदरम्यान भारतातील आरक्षण संपवण्याच्या हेतूने आपली भूमिका मांडली होती त्या भूमिके विरुद्ध भाजपा आक्रमक झाले असून जोपर्यंत राहुल गांधी जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यानिमित्ताने काँग्रेसचा आरक्षणाविरुद्धचा खरा चेहरा उघड झाला असून आता जनता याचे उत्तर देईल असे देखील भाजपा ने म्हटले आहे.
आरक्षण संपणे हेच काँग्रेसचे लक्ष असल्याचे समोर येत आहे आणि राहुल गांधीचे पोटातले ओठावर आले आहे असे देखील टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले आहे. चंद्रकांत बावनकुळे यांनी अकोला येथे काँग्रेस आणि राहुल गांधी विरुद्ध निदर्शने आणि आंदोलन केले.
महाराष्ट्र मध्ये विविध शहरांमध्ये भाजपाने आंदोलने करून राहुल गांधीच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. आणि असा इशारा दिला आहे की जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहणार आहेत. जळगाव मध्ये गिरीश महाजन यांनी राहुल गांधी विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन निदर्शने केली तसेच पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन केले तसेच चंद्रपूर मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी विरुद्ध निदर्शने केली
सोलापुरात देखील या आंदोलनाचे प्रसाद उमटले सोलापुरात सुभाष देशमुख यांनी राहुल गांधीविरोधात निदर्शने केली. तिकडे नाशिक मध्ये देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेते एकवटले.
मी ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करताना कार्यकर्ते हे हाताला काळ्याफिती लावून उतरले होते आणि जोपर्यंत चैत्यभूमीवर जाऊन घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान राहुल गांधी हे आरक्षण कधीही बंद करणार नाहीत असे कधी बोललेच नाहीत असे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते नेमके कशासाठी आंदोलन करतात हा सुद्धा प्रश्न पडला आहे असे देखील थोरात यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लावला कोट्यावधींचा चुना शेतकऱ्यांची अजितदादांकडे कैफियत
आता शेतकरीही वीज विकणार आणि पैसे कमवणार -देवेंद्र फडणवीस
बळीराजासाठी आनंदाची बातमी- कांद्यामधील निर्यात शुल्क पूर्ण हटवले.