रेशन कार्ड बाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर सार्वजनिक वितरण विभाग
Ration card रेशन कार्ड बाबत सार्वजनिक वितरण विभागाने एक निर्णय घेतला असून नवीन रेशन कार्ड हे आता फक्त ऑनलाईनच्या माध्यमातूनच मिळू शकणार आहे. आणि जर कोणाला रेशन कार्ड बाबत दुरुस्ती असतील तर त्या फक्त ऑफलाईन अर्जाद्वारे स्वीकारण्याची परवानगी नाशिक सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.
जर नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर अर्ज हे ऑनलाइनच्या माध्यमातून स्वीकारले जातील. नाशिक जिल्हा सार्वजनिक वितरण विभागाने रेशन कार्ड बंद चा निर्णय घेतला असून रेशन कार्ड द्वारे मिळणाऱ्या सुविधा मिळत राहतील अशी घोषणा देखील केली आहे
जर रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती किंवा रेशनला नवीन नाव जोडणे अशा प्रक्रिया करायच्या असतील तर तर त्या ऑफलाइन माध्यमातून करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे 52 532 धान्य वितरण दुकाने आहेत. इत्यादी दुकानांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये धान्य वितरण होत असते.
अंत्योदय कार्डधरकांना आणि प्राधान्यक्रमातील कार्ड धारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला जातो. तसेच पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना उत्पन्न दाखल्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाते. गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 16000 रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करण्याचे काम पुरवठा विभागाने केले असून यामुळे पुरवठा विभागावर ताण आला. मध्यंतरी ऑनलाईन कार्डधारकांसाठीची प्रक्रिया सुद्धा काही काळासाठी बंद होती
त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया जर सुलभ झाली तर रेशन कार्डधारकांना दुरुस्तीसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नसल्याचे बोलले जात आहे. यांच्या माध्यमातून आधार कार्ड प्रमाणे रेशन कार्ड देखील प्रिंट मिळू शकेल..