लक्षात असू द्या वस्तादनं डाव राखून ठेवलाय-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
दसऱ्याच्या निवडणुका जवळ येईल तसतसं राजकीय आरोप प्रत्यारोपांची वाढ होत आहे. आपल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी अजितददांनी जनसमान यात्रा सुरू केली आहे ही जनसमान यात्रा आज अहेरी येथे पोहोचले आहे. याच जन सन्मान यात्रेला संबोधित करताना अजितदादांनी भाषणावेळी हे वाक्य म्हटले आहे.
चूक भूल करू नका आपल्या वडिलांसोबत रहा आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊ नका अशी तंबी अजितदादा यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येला दिले आहे. धर्मराव बाबा आत्राम हे सध्याच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम करत आहेत. आपल्याला लेखीवर बापाशिवाय कोणाचा जास्त प्रेम नसतं हे लक्षात ठेवून निर्णय घ्या आणि आपल्या बापाच्या विरोधात कधीही जाऊ नका असा इशारा त्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येला दिला आहे.
पुढे अजितदादा पवार असेही म्हणाले की विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरू आहे. त्याला बळी पडू नका असा सल्लाही त्यांनी आत्राम यांच्या कन्येला दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले की मुलगी ही नेहमी लग्न झाल्यानंतर सासरी जात असते परंतु धर्मराव बाबा आपल्या मुलीला सासर आणि माहेर यातील फरक जाणून दिला नाही. आता तीच मुलगी वडिलांच्या विरोध जात असेल तर हे फार चुकीचे आहे असे देखील त्यांनी म्हटले. ज्या मुलीला वडिलांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवलं तीच मुलगी सध्या आता वडिलांच्या विरोधात जात असेल तर त्याचा काही उपयोग नाही असे देखील ते म्हणाले.
तसे त्यांनी विरोधकांना इशारा दिला की घरामध्ये फूट पाण्याचे काम तुम्ही करू नका ते मी ते मी जवळून पाहिलं आहे. आणि त्याचा अनुभव देखील घेतला आहे असेही कबुली त्यांनी या वेळेस भाषण करताना दिली. आणि ते समाजाला देखील आवडत नाही. त्यांनी वस्तादाचे उदाहरण देताना म्हटले की वस्ताद नेहमी हा आपल्या शिष्याला सर्व डाव शिकवत असतो परंतु एक डाव कधी शिकवत नसतो. याची कल्पना असू द्यावी. आणि तो डाव धर्मराव बाबा आत्राम यांनी राखून ठेवला असेही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या टोला त्यांच्या मुलीला मारला. तो डाव बाहेर काढण्याची वेळ देखील आणू नका असे ही विनंती त्यांनी केली.
धर्मराव बाबा यांनी देखील शरदचंद्र पवार पक्षावर टीका सोडले. लोकांचे पक्ष फोडणारा पक्ष आज माझेच घर फोडत आहे असेल देखील त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आठवला शरदचंद्र पवार गटाला मारला.