लाडक्या बहिणी च्या लाभार्थीने डोकं लावून कमावले एवढे रुपये..

लाडक्या बहिणी च्या लाभार्थीने डोकं लावून कमावले एवढे रुपये..

लडकी बहन योजना ही मुळातच महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू झाली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक आर्थिक स्थिरता यावी हाच उद्देश सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. परंतु या योजनेमध्ये काही नाही गैरमार्गाने फॉर्म भरून निघण्याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार देखील समोर आला. परंतु याच योजनेचा फायदा घेत एका बहिणीने व्यवसाय सुरू करून इतरांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला दीड हजार रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये आपल्या बहिणीच्या खात्यात सरकारने जमा केले आहे. या पैशाचा वापर कोणी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करतोय तरी कोणी सिलेंडर खरेदीसाठी करतोय. काहींनी आपल्या मुलाच्या शिक्षणादेखील या पैशाचा वापर केल्याचे उदाहरण आहेत.

अशाच एका लाडक्या बहिणीच्या लाभार्थीने या पैशाचा उपयोग घुंगरू व्यवसायासाठी केला आहे. अशी तरुणी आहे मुंबई मधील काळाचौकी परिसरातील आहे. त्या तरुणीचे नाव आहे प्रणाली कृष्णा बारड. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या सणाच्या तोंडावर सुरू केलेला हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरला असून तिने या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कामगिरी देखील केली आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या बहिणीचे उदाहरण देत विरोधकांवर टीका केली असून या पैशाचा उपयोग हा आमच्या बहिणीसाठी होत असून त्या आपल्या पायावर देखील उभा राहिला मदत होत आहे. एकनाथ रावजी शिंदे यांनी या बहिणीचे कौतुक करत या पैशाचा दुरुपयोग होत नाही हे देखील सिद्ध होत आहे असे देखील सांगितले आहे. योजना नक्कीच गरजवंतासाठी लाभाची ठरणार आहे असे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले.

प्रणालीने गणेशोत्सव तोंडावर सुरू केलेल्या या वर्षातून दहा हजाराची कमाई देखील केली आहे. या तरुणी आपल्या घुंगरू व्यवसायासाठी सोशल मीडियाचा देखील आधार घेऊन एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. ही योजना प्रणाली सारख्या तरुणांसाठी संजीवनी ठरल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले आहे व तिचे कौतुक देखील केले आहे.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की पैशाच्या राशीत लोळणार यांना दीड हजाराच्या मूल कळत नाही परंतु अशा तरुणणींसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरली असून या तरुणीने या पैशाचा उपयोग व्यवसाय सुरू करण्यासाठी केला आणि तिचा व्यवसाय चांगला चालू आहे असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे

महत्त्वाच्या बातम्या 👇

Maharashtra gov. आता लवकरच आईच्या नावाचा सातबारा निघणार स्त्री सन्मानासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय

Mumbai Dabewala महाराष्ट्र सरकारचं मुंबईच्या डबेवाल्यांना गिफ्ट

Ladki Bahin Yojana News लाडकी बहीण योजनेतील अजून एक गैरप्रकार 

Leave a Comment