वाद विकोपाला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पूर्व मंत्री आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडला हे पाहण्यासाठी आज राजकोट किल्ल्यावर आले होते. अशातच रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे आपल्या समर्थकसह दाखल झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संबंधित घटना झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग च मालवण किनार्यावर हा पुतळा आठ महिन्यापूर्वीच उभारण्यात आला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले होते.
अशा तशी घटना कशी गल्ली आहे ते पाहण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि भाजप कार्यकर्ते एकत्रित जमा झाल्यानंतर तुफान राडा पाहायला मिळाला.
महाविदास आघाडीचे काही नेते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याने वाद उफाळून आला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. सध्या परिस्थिती नियंत्रण असून त्या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना करण्यात आला आहे खबरदारीसाठी हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महाविकास आघाडी कडून आज मालवण बंदची हाक देण्यात आले होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यामध्ये आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार जयंत पाटील अंबादास दानवे असे मोठे नेते संबंधित घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचे निरीक्षण करून त्यांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा देखील काढला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी या भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की हे हे सरकार भ्रष्टाचारी आहे. त्यांनी असे म्हटले की दोन-तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु ती कोर्टाच्या निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यांनी असाही आरोप केला की माझे राज्यपाल भगतसिंग कोशरे देखील समुद्रकिनाऱ्यावर राहत होते त्यांची टोपी कशी हवेत नाही उडाली.
त्यांनी पुढे असे म्हटले की या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर एक सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येतील ही निदर्शने महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येतील महाविकास आघाडीचेचे सर्व नेते यात सामील होतील. याचबरोबर त्यांनी सामान्य शिवसेनेने त्यांना देखील विरोध प्रदर्शनामध्ये दाखल होण्याचे आवाहन केले आहे.
शिवप्रेमी हुतात्मा चौकापासून ते गेटवेपर्यंत मार्च काढण्यात येईल. या मार्चमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते सामील होणार आहेत.
यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी असा आवाहन केले ही यामध्ये राजकारण करू नका. त्यासंबंधी चौकशी करून ही घटना समिती कशी घडली हे समोर येईल.