विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी

विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी

Nitin Gadkari महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवय उंचावल्या आहेत. नितीन गडकरींचे मंत्रिमंडळाचे स्थान हे खूपच मानाचे समजले जाते. नितीन गडकरी हे लोकप्रिय नेत्यापैकी एक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या कामातून हे सिद्ध सुद्धा केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नतर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक आघाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

नागपूर मधील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की विरोधी पक्षातील एका नेत्याने त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देऊ केली होती. गडकरींच्या या विधानामुळे राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विधान खूपच मोलाचे आहे.

नितीन गडकरी हे आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असून ते आपल्या सभांमध्ये तसे वक्तव्य नेहमी करत असतात. त्यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी एक घटना घडली. एका नेत्याने मला सांगितले की तुम्ही पंतप्रधान होत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मी म्हणालो की मी तुमचा पाठिंबा का घ्यावा आणि तुम्ही कामाला पाठिंबा देत आहात? राजकारणामध्ये पंतप्रधान हे माझे ध्येय नाही. पंतप्रधान पदासाठी मी माझ्या तत्वांशी आणि माझ्या पक्षाशी एकनिष्ठ असून त्याच्याशी कधीही करणार नाही.

नरेंद्र मोदी हे 2014 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आता त्यांची ही तिसरी टर्म असून त्यांच्या नतर पंतप्रधान पदासाठी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि अमित शहा तसेच राजनाथ सिंह हे पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात होते. तसेच नितीन गडकरी सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे यावरून समजते.

महत्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून वंचितच त्यांच्या विरोधात आंदोलन

काँग्रेसचा मेगा प्लान तयार राहुल आणि प्रियंका महाराष्ट्र मध्ये सभांचा धडाका उडवणार

आनंद आश्रमातील घटनेवरून संजय राऊत संतापले, आनंद दिघे असते तर..

Leave a Comment