शुभ योग येणार आहे जुळून. प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि पैसा..

शुभ योग येणार आहे जुळून. प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि पैसा..

Bhavishya बहुतेक जन हे ज्योतिषशास्त्राला धरून चालत असतात किंवा ज्योतिष शास्त्राला मानणारा वर्ग खूप मोठा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कन्याराशीमध्ये एक महत्त्वाचा योग जुळून येत आहे. हा योग शुभ फळ  देणारा ठरणारा असून पुढील राशीसठी हा योग अत्यंत शुभ असा असणार आहे.

सूर्य ग्हाला ग्रहांचा राजा मानले जाते. हा सूर्यग्रह 17 सप्टेंबर 2024 या दिवशी संक्रमण करणार आहे. सूर्याचा संक्रमण झाल्यानंतर सूर्य हा ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल. या कन्याराशी मध्ये आधीपासूनच केतू विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि केतू यांची युती घडवून येईल आणि ही युती किंवा संयोग खूप असे बदल घडवून आणेल.

त्यानंतर ज्या ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते असा बुधग्रह 23 सप्टेंबर रोजी कन्या राशीतच प्रवेश करणार आहे. कन्या राशि मध्ये आधीपासूनच विराजमान असलेले सूर्य आणि केतू यांच्याबरोबर बुध ग्रह यांची युती होऊन त्रि ग्रहयोग जुळून येणार आहेत. सूर्य आणि बुध ग्रहाची युती झाल्यामुळे बुधादित्य योग घडून येणार आहे. या सर्व संयुगाचा बारा राशीवर संमिश्र परिणाम होणार असून यामधील तीन राशींना अत्यंत शुभ फळे मिळणार आहेत.

तूळ राशीला हा संयोग अत्यंत शुभफले देणारा ठरेल. तूळ राशीच्या लोकांवर याचा चांगला परिणाम होणार आहे. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तसेच सगळे तुमची कीर्ती पसरणार आहे. समाजामध्ये तुम्हाला मानसन्मान सुद्धा ही युती मिळवून देणार आहे. तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील या काळामध्ये  करू शकता. तुम्हाला काही आजारासंबंधी तक्रारी असतील तर या काळामध्ये त्या दूर होण्याची शक्यता जास्त आहे.

वृश्चिक राशीला हा शुभ संयोग अचानक धनलाभ देणारा ठरणार आहे. विविध मार्गाने तुम्हाला पैसा मिळू शकतो तुमची जर काही अडकलेली किंवा रखडलेले काम असेल ती मार्गी लागतील. या काळामध्ये तुमच्या आरोग्य संबंधित तक्रारी दूर होणं होऊन आरोग्य उत्तम असणार आहे. पैशाचा वापर हा विचारपूर्वक करा.

मकर राशि साठी हा त्रिग्रहयोग पद पैसा मिळवून देणारा ठरेल हा त्रिग्रहयोग अत्यंत शुभ फळ देणारा असणार आहे. तुमचा पैसा या काळामध्ये वाढीस लागू शकतो. तुमच्याकडे नवीन जबाबदारी यऊ शकतात.

टीप- वरील लेख सर्वसाधारण माहितीसाठी असून या लेखातून कोणताही दावा करण्यात येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

दोनच दिवसात सोने 2000 आणि चांदी सात हजाराने महाग.

विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी

राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून वंचितच त्यांच्या विरोधात आंदोलन

Leave a Comment