सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी बातमी खाद्यतेल झाले महाग

सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी बातमी खाद्यतेल झाले महाग

काल परवाच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी कच्च्या तेलाच्या आयात शुल्कावर दहा टक्के नी वाढ करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. परंतु सर्वसामान्य लोकांना यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे खाद्यतेलाचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती सामान्यांचे बजेट नक्कीच हलणार आहे.

केंद्र सरकारने कालच शेतकऱ्यांसाठी सोयाबीनला जास्त भाव मिळावा यासाठी खाद्यतेलाच्या आयात किमतीवर दहा टक्के वाढ केली होती. मात्र ही घोषणा झाल्यानंतर लगेच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ पहावयास मिळाली आहे. लगेच किमतीमध्ये वाढ कशी होते असा सामान्य माणसांना प्रश्न पडत आहे. यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडत आहे.

सोयाबीन तेलाचे पहिले दर 110 होते आता ते 130 रुपये असणार आहेत.

शेंगदाणा तेलाचे पहिले दर 175 रुपये होते आता ते 185 रुपये झाले आहे.

सूर्यफूल 13 च पहिले दर 115 होते आता ते 130 रुपये झाले आहेत.

वरील सर्व भाव हे किलो प्रमाणे आहेत.

शेतकऱ्यांकडून सोयाबीनचा भाव वाढाव यासाठी तेलाच्या आयात किमतीमध्ये अशी सातत्याने मागणी होती. त्यानुसार केंद्र सरकारने यामध्ये 20 टक्के वाढ केल्यानंतर तिकडे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. सरकारकडून कच्चे पाम तेल सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल यावर २० टक्के आयात शुल्क वाढीव केले आहे.

तसेच रिफाइंड सूर्यफूल तेल आणि सोयाबीन यावर पूर्वी आयात शुल्क13.75 टक्के होते. आता ते 35.75 टक्के करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना सर्व तेलावर आयात शुल्क हे दहा ते वीस टक्के पर्यंत वाढवले होते तसेच कांदा आणि तांदूळ यांचे निर्यात शुल्क कमी केले होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा होता. परंतु दुसरीकडे याचा विपरीत परिणाम झालेला दिसत आहे.

आता आता सरकार यातून काय समतोल मार्ग काढेल हेही पाहणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या

शुभ योग येणार आहे जुळून. प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि पैसा..

दोनच दिवसात सोने 2000 आणि चांदी सात हजाराने महाग.

विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी

 

 

Leave a Comment