सावत्र आईचे क्रूर कृत्य अंथरणामध्ये लघुशंका केली म्हणून मुलीला दिले चटके
कोल्हापूर मध्ये माणुसकीच्या नात्याला लाजवेल आणि काळीमा असेल अशी घटना घडली आहे. पाच वर्षे वय असलेल्या मुलीवर तिच्याच सावत्र आईने अमानुष अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. अशा या क्रूर घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथे हा प्रकार घडला असून अंथरणामध्ये लघुशंका केली म्हणून सावत्र आई पूजा शुभम मगरे हिने तिच्या सावत्र मुलीला तोंडावर चटके दिले आहेत. घरातील उलथण्याने तिच्या तोंडावर चटके दिल्याने तिच्या तोंडाला जबर जखमा झाल्याचे कळत आहे.
मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना मुलीने लघु शंका केली असता सावत्र आईने शिक्षा म्हणून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. हा हा अमानुष प्रकार पाहून अनेक जणांनी तिच्या आईला गंभीर शिक्षा होण्याची देखील मागणी केली आहे.
मुलीचे वडील कामावरून घरे आल्यानंतर सगळ्या प्रकार उघडतेस आला त्यानंतर त्यांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या सावत्र आई विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
आपल्या मुलांबरोबर सावत्र आईच्या अशा वागण्याने गंभीर परिणाम होत आहेत अशा या महिलेला गंभीर शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे आणि अशा गुन्ह्याबद्दल गंभीर शिक्षेची तरतूद देखील करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी पुण्यात सुरू होणार दोन वंदे भारत ट्रेन
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार कोसळणार ‘या’नेत्याचा दावा
राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-भाजप