हरियाणा मधील निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महाविकास आघाडीवर जोरदार टीका 

हरियाणा मधील निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महाविकास आघाडीवर जोरदार टीका

मुंबई-आज हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. हरियाणा मधील जनतेने एक जोरदार संदेश दिला असून महाराष्ट्र मधील सुद्धा जनता विरोधकांनी पसवलेल्या फेक नेरीटिवला कधीच बळी पडणार नाही.

महाराष्ट्र मधील विरोधक ते चुकीचा प्रचार करत असून महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाविकास आघाडीने फक्त जनतेला आश्वासने दिली. त्यांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची प्रगती थांबली हे जनतेला माहीत असून, शिंदेंनी महाविकास आघाडी मधील नेत्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हरियाणा मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. या विजयानंतर एकनाथराव शिंदे यांनी महा विकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी असा विश्वास देखील व्यक्त केला की महाराष्ट्रातील लोक देखील विकासाच्या दिशेने जातील. जिथे भाजप आहे तिथे विकास आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आगामी निवडणुका संदर्भात बोलायचं झाले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्पष्ट केले की भाजपाचे अधिक मजबुतीने उभे राहिल. त्यांनी त्यांच्या खासदारांना व आमदारांना जनतेमधील असलेल्या समस्यांकडे लक्ष देण्याची निर्देश दिले आहेत. तसेच राज्याचे विकास करणे सुरू आहे ती अत्यंत वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर महाविकास आघाडी यांच्या नेत्यांनी लगेच प्रत्युत्तर दिले असून त्यांचे सरकारचे अपयश लपवण्यासाठी ही वक्तव्य करण्यात येत असल्याचा पलटवार केला आहे. महा विकास आघाडीला असा विश्वास आहे की जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला योग्य मोजणी देईल.

महाराष्ट्रामध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही जिथे बसलात हे तर आमचेच पाप आहे,.. उद्धव ठाकरे यांची सभेमध्ये जोरदार हल्लाबोल 

राज्यात दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागू होणार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा इशारा

हरियाणा आणि जम्मू काश्मीर चा कौल कुणाला मिळणार.. आज होणार फैसला

 

Leave a Comment