दोनच दिवसात सोने 2000 आणि चांदी सात हजाराने महाग.
Gold price hike सोने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा आणि नंतरच सोने खरेदी करा. गेले महिनाभर सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये कपात झाल्याचे बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व बँकेने कमी केलेले व्याजाचे दर याचा परिणाम म्हणून चांदीच्या भावामध्ये किलोमागे सात हजार रुपयांची तुफानी वाढ झाली असून सोन्याच्या भावामध्ये सुद्धा दोन हजार रुपयांची वाढ पहावयास मिळत आहे.
तज्ञांनी तर असं मत मांडलं आहे की 1991 नंतर दोन दिवसांमध्ये म्हणजे अगदी कमी काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये झालेली ही विक्रमी वाढ आहे. ही वाढ दिवाळीपर्यंत स्थिर राहील असे देखील तज्ञांचे म्हणणे आहे. देशातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ खामगाव येथे चांदी 91 हजार प्रतीक किलो मिळत असून सोने हे 75 हजार दोनशे रुपये प्रति तोळा मिळत आहे.
काल खामगाव सर्व मार्केटमध्ये चांदीच्या भावामध्ये साडेचार हजार रुपयांची विक्रमी वाढ पहावयास मिळाली. फक्त आपल्या देशातच सोन्या-चांदीचे भाव वाढतच नाहीत तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्या-चांदीचे भाव सतत वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरामध्ये एखादं कार्य असताना सोनं चांदी घेणे सुद्धा दुरापास्त होत चालले आहे. हे भाव सर्वसामान्यांच्या आवाका बाहेरचे आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील काळात आमकी सोन्याचा भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आमकी सोना हे दागिने बनवण्यासाठी वापरण्यात येते. येत्या काळात सुद्धा अमेरिकेतील फेडरल रिझर्व बँकेचे व्याजदर कमी करण्याची शक्यता असून सोन्याचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली असून याचा फायदा सर्व व्यापारी घेऊ शकतात असे देखील मत आहे. त्यानंतर लग्नसरायचा सीझन चालू झाल्यामुळे सुद्धा सोन्याच्या भावामध्ये वाढ पहावयास मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी
राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून वंचितच त्यांच्या विरोधात आंदोलन
काँग्रेसचा मेगा प्लान तयार राहुल आणि प्रियंका महाराष्ट्र मध्ये सभांचा धडाका उडवणार