आधार कार्ड विषयी सरकारकडून गुड न्यूज

आधार कार्ड विषयी सरकारकडून गुड न्यूज

Aadhar Card update तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी गुड न्यूज ठरणार आहे. तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर सरकारने तुम्हाला मुदत वाढवली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत आता 14 डिसेंबर पर्यंत असणार आहे. UIDAI ने मोफत आधार अपडेट ची मुदत वाढवून सर्व सामान्य लोकांना दिलासा दिला आहे.

फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ची मदत पूर्वी 14 सप्टेंबर ही होती. परंतु ती आता वाढून 14 डिसेंबर करण्यात आली आहे. 14 डिसेंबर नंतर तुम्हाला काही अपडेट करायचे असेल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल त्या आधी हे काम निशुल्क होऊन जाईल. युआयडीएआयने सर्वसामान्य लोकांना या सुविधाच लाभ घेता यावा यासाठी 14 डिसेंबर पर्यंत मोफत कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत वाढवली आहे. असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे.

ज्या लोकांनी दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड मध्ये अपडेट केले होते त्यांना अपडेट करण्याची गरज आहे. आधार कार्ड अपडेट हे प्रत्येक दहा वर्षांनी करणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे वैयक्तिक बायोमेट्रिक शी जोडले आहे. आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, तसेच रहिवासी प्रमाणपत्र इत्यादींचा प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. कागदपत्रे माय आधार पोर्टलवर अपलोड केली जाऊ शकतात. आधार नोंदणी केंद्रावर ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर मिळालेले वन टाइम पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे.

अनिवासी भारतीय देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. लहान मुलांचे आधार कार्ड हे प्रत्येक पाच वर्षाला अपडेट करावे लागते.

महत्वाच्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी बातमी खाद्यतेल झाले महाग

शुभ योग येणार आहे जुळून. प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश आणि पैसा..

विरोधी पक्षातून मला पंतप्रधान पदाची ऑफर होती- नितीन गडकरी

 

Leave a Comment