एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.

एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.

Maharashtra State transport आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची जीवन वाहिनी समजली जाणारी एसटी सर्वांना परिचयाची आहे. पूर्ण ग्रामीण भागामध्ये एसटीचे जाळे पसरले असून ग्रामीण भागातील दळवळणाचे एकमेव साधन म्हणजे एसटी म्हणजेच लाल परी. दररोज लाखो प्रवासी या लाल परीने प्रवास करत असतात. परंतु प्रवास करत असताना हा प्रवास काही वेळा सुखाचा होतो काही वेळा तंटे आणि कटकटीचा देखील ठरत असतो.

कधी बस चालक तर कधी वाहकासोबत प्रवाशांची तक्रार होते त्यांचा नाहक त्रास इतर प्रवाशांना देखील काही ठिकाणी बसचे वाहक आणि चालक सुद्धा उद्दामपणे वागलेले अनेक उदाहरणे आहेत. अशाच लोकांना आळा बसवण्यासाठी एसटी महामंडळाने एक निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एखाद्या वेळेस एस टी मध्ये काही बिघाड झाल्यास किंवा भांडणाचा मुद्दा उद्भवल्यास थेट आगर प्रमुखांना फोन लावण्याची सोय एसटी महामंडळ करून देणार आहे.

काही ठिकाणी एसटीच्या चालक अतिशय वेगाने गाडी चालवत आहे अशी देखील तक्रार असते. तसेच गाडीचा चालक मोबाईलवर बोलत असल्याचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाले आहेत. प्रवास करताना आपल्याला आपले अपेक्षित ठिकाणी वाहकाने उतरले नाही किंवा गाडी थांबवली नाही तरी अशा तक्रारी कोणाकडे करायच्या असा प्रश्न पडत असायचा.

परंतु एसटी महामंडळाने यावर उपाय काढला असून आगार प्रमुखाचा फोन थेट एसटीच्या आत मध्ये दर्शविण्यात येणार आहे. तुम्हाला अशा विविध प्रकारच्या तक्रारी त्या फोन नंबर वर करता येतील आणि शंकेचे निरसन करून घेता येईल. एसटीमध्ये प्रवास करताना काही अडचण आल्यास या नंबरवर संपर्क साधल्यास याचे निरसन नक्कीच होईल असे उद्दिष्ट या मागचे आहे.

बस मध्ये च आगर प्रमुखांचा नंबर झळकणार असून नवीन निर्णयानुसार बस चालकाच्या पाठीमागे सीटवर हा नंबर दर्शविण्यात येणार आहे प्रवासात काही अडचण आले असे या नंबर वर संपर्क साधले तर तुमच्या अडचण नक्की दूर होईल आणि वाहक आणि चालक यांच्या मनमानीला देखील चाप बसेल हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा, राजकारणामध्ये खळबळ

भारताच्या निर्णयाने पाकिस्तानी कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले.

आधार कार्ड विषयी सरकारकडून गुड न्यूज

 

Leave a Comment