Lemon Rates ऐन पावसाळ्यात सुद्धा लिंबू तेजीत,एका किलोला ‘इतका’ भाव
Lemon Rates आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबू आहे. पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि चटपटीत लोणचे बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबा मध्ये अनेक प्रकारचे शरीराला पोषक असणारे घटक आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
परंतु हेच लिंबू आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा मागणी वाढल्याने महाग झाल्याचे चित्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहावयास मिळत आहे. सध्या व्यापाराच्या म्हणण्यानुसार होलसेल मध्ये 75 रुपये किलो प्रमाणे लिंबू मिळत असून ते किरकोळ बाजारामध्ये शंभर रुपये असल्याचे म्हटले आहे. आणि पावसाळ्यात सुद्धा लिंबू महाग झाल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे. लिंबाचा पुरवठा कमी असून त्या तुलनेमध्ये मागणी जास्त असल्याने बाजारात दरवाढीचे चित्र असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
दरवर्षी जून ते ऑगस्टचा विचार करायला झाल्यास या कालावधीमध्ये लिंबाला फार कमी मागणी असते परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला असल्यामुळे लिंबाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे चित्र असून त्यामुळे लिंबाचे भाव कडाडल्याचे सांगितले गितले जात आहे. तसेच बाजार समितीमध्ये आलेल्या मालाला मुंबई दिल्ली कलकत्ता इत्यादी शहरातून खूप मोठी मागणी असल्यामुळे मला हा बाहेर जात आहे. त्यामुळे इथले भाव वाढल्याचे चित्र आहे.
बाजारामध्ये एक लिंबू खरेदी करायची झालास दहा रुपये मोजावे लागतात जास्त पाऊस आणि मिळणारे उत्पन्न कमी आणि पावसामुळे खराब झालेले लिंबाचे झाडे यामुळे लिंबू भाव वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये हा दर 120 ते 130 रुपयाच्या दरम्यान होता परंतु पावसाळ्यामध्ये सुद्धा शंभर रुपये पर्यंतचा दर टिकून आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षाचा विचार करायला यावर्षी लिंबाचा भाव यात प्रचंड तेजी आहे असे व्यापाऱ्याने देखील सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर खरमरीत टीका
Bacchu Kadu आम्हाला तुमची योजना नको, कांद्याला भाव द्या.बच्चू कडू सरकारवर बरसले
Gopichand padalakar on Sharad Pawar. शरद पवारांनी 50 ते 60 वर्षे फक्त लुटायचं काम केलं आहे