30 September 30 सप्टेंबरला मिळणार लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता.

30 September 30 सप्टेंबरला मिळणार लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता.

महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना आतापर्यंत दोन हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले असून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेमध्ये नोंदणी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी ही योजना  चालू  केली आहे.

पहिला व दुसरा हप्ता असे दोन्ही मिळून महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये जमा करण्यात आले होते. या पैशांच्या माध्यमातून काही महिलांनी आपल्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी याचा उपयोग केला तरी काही महिलांनी नवीन व्यवसायासाठी ही रक्कम उपयोगामध्ये आणली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक स्थिती साठी उपयोगी पडत असलेले दिसत आहे. तसेच महिला स्वावलंबी होण्यास देखील य योजनेच्या माध्यमातून मदत मिळत असल्याचे दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून या योजनेच्या प्रसारासाठी स्थानिक संस्थांनी देखील सहभाग घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन देखील शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्र मध्ये सुरू करण्यात आली होती. महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच एकमेव उद्देश हा योजना सुरू करण्यामागे होता असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबरच्या सुमारास पडणार असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

Lemon Rates ऐन पावसाळ्यात सुद्धा लिंबू तेजीत,एका किलोला ‘इतका’ भाव 

Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर खरमरीत टीका

Bacchu Kadu आम्हाला तुमची योजना नको, कांद्याला भाव द्या.बच्चू कडू सरकारवर बरसले 

Leave a Comment