विठूरायाच्या सुलभ दर्शनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद, दर्शनरांगेसाठी 129 कोटी रुपये मंजूर 

विठूरायाच्या सुलभ दर्शनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद, दर्शनरांगेसाठी 129 कोटी रुपये मंजूर

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थ क्षेत्र म्हणजे पंढरपूर. पंढरपूर मध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच चालली असून दर्शनासाठी असलेले रांग मोठ्या प्रमाणावर लांब लागत असते. यामुळे भाविकांना वेळेत दर्शन होणे कठीण होऊन बसले आहे. दर्शन रांगेमध्ये भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते ऊन वारा पाऊस तसेच आरोग्याचा देखील बाहेर त्यांना त्रास होत असतो.

वारीच्या काळामध्ये तर दर्शनासाठी 25 ते 30 तास एवढा अवधी लागत असल्यामुळे दर्शन मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये आरोग्य सुविधा वेळेवर पोहोचत नाही. दर्शन रांगेमध्ये भाविकांचे प्रचंड हाल होत असतात. तसेच दर्शन रांगेमध्ये घुसखोरी देखील वाढल्याचे प्रमाण पहावयास मिळत आहे. याचा त्रास दर्शन रांगेमध्ये उभारणाऱ्या भाविकांना प्रचंड होत असतो.

या सर्व उपायावर (Government ) शासनाने एक आराखडा मंजूर केला असून यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना होणारा त्रास कमी होऊन विठुरायाचे सुलभ दर्शन होणार आहे. पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन होण्यासाठी 129 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमधून भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी आधुनिक पद्धतीचे दर्शन व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रित करणे आणि ऑनलाईन दर्शन व्यवस्था तसेच भाविकांना त्यांना आरामदायी दर्शन व्यवस्था उभी करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पंढरपूरच्या सुरक्षेवर देखील भर देण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच मंदिर परिसरात सुरक्षा वाढवणे हा देखील उद्देश आहे.भाविकांच्या सोयीसाठी नवीन विश्रांती गृह देखील बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा विविध निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

30 September 30 सप्टेंबरला मिळणार लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता.

Lemon Rates ऐन पावसाळ्यात सुद्धा लिंबू तेजीत,एका किलोला ‘इतका’ भाव 

Balasaheb Thorat बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर खरमरीत टीका

Leave a Comment