Devendra fadnvis बहिणींनो सावत्र भावापासून तुम्ही सावध राहा. लाडक्या बहिणींना दिला सल्ला.
शिर्डी: शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सन्मान कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकावर एक गंभीर आरोप केला आहे. आमची योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून विविध लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागले असून त्यांनी योजना बंद करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना विरोधक कोर्टामध्ये सुद्धा गेल्याची देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना सांगितले.
तसेच त्याने आदित्य ठाकरे वर देखील आरोप केला असून आदित्य ठाकरे म्हणतात त्यांची सत्ता आली तर आमच्या सर्व योजना (scheme)बंद करून टाकणारं,विरोधी पक्षातला एक महिला नेत्या देखील असे म्हणाले की सत्ताधारी पक्षांनी ही लाडक्या बहिणीला एक प्रकारची लाच दिली आहे परंतु तुम्हाला लाचखोर म्हणण्याचा अधिकार या विरोधी पक्षाला कदापि नाही. माझ्या लाडक्या बहिणीने एवढे लक्षात ठेवावे की आम्ही तिघे मिळून ही योजना पुढचे पाच वर्ष निरंतर चालविणार आहोत असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिर्डी मध्ये लाडक्या बहिणीच्य सन्मानार्थ कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते या कार्यक्रमाला पालकमंत्री कृष्ण विखे पाटील तसेच आमदार आशुतोष काळे मोनिका राजळे सुजय विखे पाटील तसेच विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच जिल्ह्यातून आलेल्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमांमध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे देखील उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
आता पर्यंत राज्यातील एक कोटी 90 लाख बहिणीच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यात आल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असून उरलेल्या साठ लाख बहिणीला लवकरच पैसे मिळतील आणि एकाही बहिणीला दिवाळीच्या ओवाळणीपासून वंचित ठेवणार नाही महिलांना विकासाच्या प्रवाहात आणल्याशिवाय भारताचे स्वप्न कसे पूर्ण होणार असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
आपल्या देशातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाडकी बहीण आणि लखपती दीदी सारख्या योजना सुरू केल्या असून मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारने प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सवलस दिल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांनी 53 टीएमसी पाणी पूर्वेला आणून नगर नाशिक मराठवाड्यामधील दुष्काळ हटवण्याचे योजना मांडली होती या योजनेला माहिती सरकारने मंजुरी दिली असून त्याची निविदा दखील काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामुळे मराठवाड्यातील तसेच नाशिक नगर परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
PM Kisan शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 18 वा हप्ता
Amit Shah: यांचा पक्षच मुळापासून संपवून टाकायचा आहे अमित शहा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर कडाडले
विठूरायाच्या सुलभ दर्शनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद, दर्शनरांगेसाठी 129 कोटी रुपये मंजूर