Maharashtra Election news: महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणखी एक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार हे जवळपास निश्चित झाले असून सर्वच पक्ष यामुळे मोर्चे बांधलेला लागले असून पक्ष बांधणी जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. दिल्लीचे महत्वाचे नेते देखील महाराष्ट्राचे दौरे करत असून काँग्रेस आणि भाजपाचे नेते महाराष्ट्र दौऱ्यावर वारंवार येत असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग देखील महाराष्ट्राचा दौरा नुकताच करून गेला आहे.
सर्व द्राक्ष पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडाला असून बैठका आणि सभा यांचे सत्र सुरू झाले आहे अशातच महाराष्ट्र राज्यामध्ये एक नवीन पक्ष होते असे येत असून येथे निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळा पक्ष स्थापन केला असून त्याचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता देखील मिळालेली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये हा पक्ष निवडणूक लढवताना नक्की दिसणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांनी या पक्षाची स्थापना गेल्या वर्षी केली होती. छत्रपती संभाजी राजे यांनी गेल्या वर्षी ही संघटना स्थापन केली होती त्यानंतर ते सक्रिय राजकारणामध्ये येणार असल्याचे सांगितले होते. परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मिळून हे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला निवडणूक आयोगाने एक चिन्ह बहाल केले असून छत्रपती संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर हे चिन्ह प्रसारित केले आहे. सप्त किरणा सह पेनाची निब हे त्यांचे चिन्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे की येणारे विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीला भरघोस मतांनी विजयी करावे.
महत्त्वाच्या बातम्या
Financial Pressure: नवीन योजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक संकट? तरीही योजनांना मंजुरी?
PM Kisan शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 18 वा हप्ता