भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप, यामुळे भाजपमध्ये पसरला नाराजीचा सूर?

भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप, यामुळे भाजपमध्ये पसरला नाराजीचा सूर?

मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये असणारे शिंदे गटाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाने जवळपास सहा जागा मिळवल्या होत्या परंतु त्यांच्या तुलनेत मधील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. आता नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने महायुतीमध्ये जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांमध्ये धुसफूस पहावयास मिळत आहे. कुठे उमेदवारीवरून तर कुठे दुसऱ्या पक्षाला दिलेल्या झुकत्या मापामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौरा असून या दौऱ्यामध्ये ते ठाण्यामध्ये असणार आहेत. मोदी साहेब हे मुंबईच्या तिसऱ्या मेट्रो लाईनचे उद्घाटन करणार असून हा कार्यक्रम मुंबई ऐवजी ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे भाजपामध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कारण ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो.

मेट्रोच्या तिसऱ्या लाईनचे उद्घाटन मुंबई ऐवजी ठाण्यात केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना शक्ती प्रदर्शन करण्याची चांगली संधी असल्याचे बोलले जाते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या सभेमुळे एकनाथ शिंदे यांचे पारडे जड होणार असल्याचे सांगण्यात येते.

तसेच महाराष्ट्र मधील विविध मंडळावर देखील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार  निवडल्याने भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. एस टी महामंडळाचे अध्यक्ष पद हे भरत गोगावले यांना मिळाले आहेत तर संजय शिरसाठ हे सिडकोच्या महामंडळाचे अध्यक्ष झाले आहेत. तसेच इतर महत्त्वाची मंत्री पदं देखील अजित पवार यांच्या गटाला मिळाल्याने भाजपमधील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.

तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये सुद्धा तेढ निर्माण झाली आहे. भाजपच्या जागांवर शिंदे गटाने आपला दावा सांगितला असून लोकसभा निवडणुकीत सुद्धा ठाण्याची जागा शिंदे गटाला न सोडण्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती.

अशा परिस्थितीमध्ये जागा वाटपावरून भाजप कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यामध्ये नाराजी नाट्य घडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक काय आहे नेमकं प्रकरण

Big News महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग झाली सुरू, किती आहे त्याची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये

Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी

 

 

Leave a Comment