आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना एक मदत म्हणून आणि त्यांना आर्थिक पाठबळ भेटावे यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पी एम किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले आहेत. याच योजनेचा अठरावा हप्ता हा कधी पडणार हा शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत होता.
कारण शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मदत म्हणून हे पैसे उपयोगात येत होते. शेतकऱ्यांना खते औषधे बी बियाणे अशा विविध शेती उपयोगी सामग्री घेण्यासाठी या निधीची शेतकऱ्यांना गरज होती. हेच औचित्य साधून शेतकऱ्यांची गरज ओळखून केंद्र सरकारने 18 व्या हप्त्याची तयारी सुरू केली असून अठरावा हप्ता हा आज पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेची दोन हजार रुपये सुद्धा आज म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे 2000 आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान निधीचे आतापर्यंत चार हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात झाले असून आज या निमित्ताने पाचवे हप्त्याचे वितरण होणार आहे. सन 2019 मध्ये सुरू झालेली पीएम किसान सन्मान निधी योजना 18 व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे.
परंतु ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नाही त्यांना या हप्त्या पासून वंचित राहावे लागणार आहे याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांनी आपली ही केवायसी अधिकृत महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन पूर्ण करून घ्यावी. आणि ज्या हप्त्याचा लाभ घ्यावा असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना झुकते माप, यामुळे भाजपमध्ये पसरला नाराजीचा सूर?
चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक काय आहे नेमकं प्रकरण
Big News महिंद्रा थार रॉक्स ची बुकिंग झाली सुरू, किती आहे त्याची किंमत आणि त्याची वैशिष्ट्ये
Navaratri नवरात्रीच्या सुरुवातीलाच शैलपुत्री देवी आपल्या भक्तावर ठेवणार कृपादृष्टी