महायुतीला आणखी एक धक्का बसणार? बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
मुंबई: विधानसभेला निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील माहितीची ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. महायुती मधील आणखी एक सामर्थ्यवान नेता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उघडपणे विरोध करणारे आणि सध्या अजित पवार गटात असणारे रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे केव्हाही निर्णय जाहीर करू शकतात. आणि आपल्या हाती तुतारी घेऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आपल्या राजकीय वाटचालीसाठी काल त्यांनी फलटणमध्ये ह कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. खटके वस्ती येथे झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची सल्लामसलत केली असून कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसारच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावरून असे स्पष्ट दिसते की रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. रामराजे नाईक निंबाळकरांसोबत इतर मोठे नेते सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करतील.
या नेत्यांमध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण सुद्धा अजित दादा पवार यांच्या गटाला राम राम करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. आमदार दीपक चव्हाण यांनी जर साथ सोडली तर अजित पवार गटाला चांगलाच झटका मिळण्याची शक्यता आहे कारण त्यांनी फोनवरून यांची उमेदवारी नुकती जाहीर केली होती.
दरम्यान अजित दादा पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यांच्या शरद पवार गटात प्रवेशाच्या बातमीला निराधार वृत्त असल्याचे सांगितले आहे. अमोल मिटकरी यांनी सांगितले की काल घेतला गेलेला मिळावा हा कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्याकरता घेतलेला होता म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करतील.
जर रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर भाजपासाठी हा धक्का ठरणार आहे कारण कालच पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर रित्या प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
पाच वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न वाढणार,2000 ची वाढ होणार.
आज पंतप्रधान मुंबईत आणि राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार, प्रचाराचा धुरळा उडणार !
आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार