आरक्षणाची मर्यादा आणि जातीय जनगणने विषयी राहुल गांधींच्या कोल्हापूरमध्ये दोन महत्त्वाच्या घोषणा
कोल्हापूर-राहुल गांधी हे पूर्वनियोजित कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांचा काल दौरा होणार होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे राहुल गांधी हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या सभेमध्ये राहुल गांधींनी 50% च्या आरक्षणाची मर्यादा हटवण्याबाबत आणि जातीय जनगणनेबाबत दोन विधाने केलेली आहेत.
देशातील 90 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय दलित यांची असून, परंतु आज 90 टक्के वर्ग प्रवाहच्या बाहेर आहे. देशातील बजेटमध्ये वाटप होत असलं तरी शंभर रुपयांमध्ये सहा रुपये दहा पैसे याचा निर्णय हा 90% समाज घेत आहे. परंतु हा भेदभाव आणि दूर करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
आरक्षणाबाबत असलेली 50% ची मर्यादा आणि जातीय जनगणनेबाबत राहुल गांधींनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडी 50% ची मर्यादा हटवणार आहे. आणि जातीय जनगणना करून 90% समाजाची असलेली अवस्था दूर करण्याचा मानस यांनी व्यक्त केला. 90 टक्के समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे हे कायद्याच्या आधारे कोणीही सांगू शकत नाही जातीय जनगणना हाच एकमेव पर्याय आहे असे त्यांनी सांगितले.
जातीय जनगणना करून त्या समाजाचे अर्थव्यवस्थेवर किती पकड आहे याचे सर्वेक्षण मी करणार आहे असे त्यांनी सांगितले तसेच भारतातील अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि मीडिया इत्यादी ठिकाणी दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आदिवासी यांची संख्या नेमकी किती आहे याचे सर्वेक्षण सुद्धा केले जाईल असे त्यांनी सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं वर आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदींना राज्यघटना मान्य नाही परंतु भारताच्या प्रत्येक नागरिकांनी राज्यघटना मस्तकी लावल्याने ते त्यांचा आदर करतात. भारतीय राज्यघटनेतील संरक्षण करायचे असल्यास 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवणे आणि जातीय जनगणना करणे हेच दोन पर्याय आहेत असेही पुढे राहुल गांधी यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
महायुतीला आणखी एक धक्का बसणार? बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
पाच वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न वाढणार,2000 ची वाढ होणार.
आज पंतप्रधान मुंबईत आणि राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार, प्रचाराचा धुरळा उडणार !