हरियाणा आणि जम्मू काश्मीर चा कौल कुणाला मिळणार.. आज होणार फैसला
Assembly election 2024 परवाच मतदान झाल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निकाल लागणार आहे. हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत रस्सीखेच सुरू असून सुरुवातीला आघाडीवर असणारी काँग्रेस काही अंशी माघारल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवली आहे. निकाल लागण्यापूर्वी काँग्रेस कडून जल्लोष सुरू झाला आहे. इकडे भाजपने देखील उत्तर देण्याचा दावा करत काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम रद्द झाल्यानंतर पहिल्यांदा सरकार स्थापन होईल. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस,नॅशनल कॉन्फरन्स, आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि भाजपामध्ये मुख्य लढत होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका या 2014 मध्ये झाले होत्या. नंतर दहा वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 63.45 एवढी होती. हे निवडणूक खूपच महत्वाची मानली जात आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही 2014 च्या मतदानापेक्षा कमी आहे. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 873 उमेदवार रिंगणात आहेत.
तर हरियाणा मध्ये 90 जागांसाठी 1031 उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये येथे भाजपची सत्ता असल्याने या निवडणुकीमध्ये भाजपने विजयाचा दावा केला आहे. हरियाणा मध्ये काँग्रेस भाजपा आम आदमी पार्टी आणि जेजेपी एवढे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
आज सकाळपासून सुरू झालेल्या मतदानामध्ये सुरुवातीला भाजपने जोरदार आघाडी घेतली होती परंतु त्यावेळी मोडून काढत काँग्रेसने भाजपला मागे ढकलले होते. त्यामुळे संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणत्याही एका पक्षाला विजयाचा दावा करता येणार नाही इतकी काटे की टक्कर या हरियाणा विधानसभा मध्ये बघायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
तुतारी’ हातात घेताच हर्षवर्धन पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदाची बातमी, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2500 नवीन बसेस दाखल होणार
देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या राशीवर करणार कृपा वर्षाव