राज्यात दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागू होणार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा इशारा
मुंबई- जसं जसं निवडणुका जवळ येतील तसे तसे आरोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा इशारा दिला असून येत्या दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता देखील वर्तवली आहे.
महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी आचारसंहितेचे पालन तंतोतंत करायला हवे असे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे यावेळी अजित पवार यांनी म्हटले की विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि आचारसंहितेचे पालन देखील सर्व पक्षांना सचित राहूनच करावे लागेल.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची नियमांची पायमल्ली होऊ नये असे देखील त्यांनी आवाहन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचे महत्त्व देखील अधोरेखित केले. यामुळे निवडणुका या पारदर्शक आणि न्याय प्रक्रिये नेच व्हायला पाहिजे. आचारसंहिता नियमाचा भंग स्वीकारार्ह नाही असे देखील त्यांनी सांगितले.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यपद्धती म्हणजे बदल करावा लागेल. असे देखील अजित पवार यांनी सांगितले. अजित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राचे राजकारणामध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
नोवेंबर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर सर्व पक्षांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन न करता त्याच्या नियमांची पालन करावे लागेल. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता अधोरेखित होईल. अजित पवार यांचा हा निर्णय राजकीय प्रभाव टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
हरियाणा आणि जम्मू काश्मीर चा कौल कुणाला मिळणार.. आज होणार फैसला
तुतारी’ हातात घेताच हर्षवर्धन पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्रातील नागरिकांना आनंदाची बातमी, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2500 नवीन बसेस दाखल होणार