PM Kissan Yojana 20 Installment: पी एम किसान सन्मान निधी 20 वा हप्ता मोठी अपडेट
PM Kisaan Yojana 20 installment: भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनेपैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभाची ठरलेली असून, वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात येत असतात. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते वितरित केले असून शेतकऱ्यांना विसाव्या हफ्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे.
SBI Bharati 2025 स्टेट बँक मध्ये भरती सुरू.पदवीधारकांना संधी
Ladaki Bahinabai Yojana लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणार 40 हजार रुपयांचे कर्ज
देशभरातील खरीप हंगाम तोंडावर आलेला असून मान्सूनची चाहूल लागलेली असतानाच शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळ म्हणून या योजनेचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील 92.89 लाख शेतकऱ्यांना एकूण हप्त्याचे वितरण करण्यात आले होते आता ही संख्या वाढून 93 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या योजनेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व कागदपत्रे योग्य रीतीने तपासले जात आहेत. अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
या दिवशी मिळणार विसावा हप्ता
एकूण कालावधी पाहता पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जूनमध्ये वितरित केला जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती प्रक्रिया जसे केवायसी तसेच फार्मर आयडी कार्ड याची नोंदणी करणे आवश्यक आहे. ई केवायसी आणि फार्मर आयडी कार्ड याशिवाय विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही असे बोलले जात आहे.
पी एम किसन सन्मान निधीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो सन्मान निधी योजना याची सुरुवात केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक 12 हजार रुपये डीबीटी द्वारे वितरित केले जात आहेत. आता यात वाढ करून भविष्यात वार्षिक पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जातील असे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
ॲग्री स्टॅक वर नोंदणी बंधनकारक
दरम्यान या योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऍग्री स्टॅक वर नोंदणी करणे बंधनकारक केलेले आहे .याची मुदत 31 मे पर्यंत देण्यात आलेले असून, जे शेतकरी 31 मे पर्यंत नोंदणी करते त्यांनाच पी एम किसान सन्मान निधीचे पुढचे हप्ते वितरित केले जातील असे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे सादर करून ॲग्री स्टॅक वर नोंदणी करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. यापुढे पात्र शेतकऱ्यांनाच पी एम किसान सन्मान निधीचा लाभ देण्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी पुढील व्यवसाय वर जाऊन योग्य स्टेप्स फॉलो करून मी केवायसी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी स्वतः या वेबसाईटला भेट देऊन वेळोवेळी स्टेटस चेक करावे.