Setu Suvidha Kendra: सेतू सुविधा केंद्राच्या शुल्कात दुप्पट वाढ.
Setu Suvidha Kendra: नागरिकांना शैक्षणिक तसेच इतर विविध कामांसाठी विविध दाखले आणि कागदपत्रांची गरज पडत असते.सर्व दाखले आपले सरकार सेवा केंद्रात मार्फत त्यांना गावातच सहज उपलब्ध होत असतात.मात्र अलीकडेच शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.कागदपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
डिजिटल महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत.जिथे ग्रामपंचायत आहे आणि त्याची लोकसंख्या 5 हजारांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी शासकीय सेवा केंद्राची संख्या दुप्पट केली जाणार आहे.या निर्णयाने नागरिकांना लाभ होणार असला तरी शुल्क वाढीने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
तसेच शहरी भागात जिथे महानगरपालिका ,नगरपंचायत आहे आणि लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे,तिथे एका ऐवजी दोन सरकारी सेवा केंद्राची उभारणी केली जाणार आहे.यामुळे नागरिकांना शासकीय कामे करणे सोईचे जाणार आहे.
हे सुध्दा वाचा 👇
PM Kissan Yojana: पी एम किसान सन्मान निधी 20 वा हप्ता मोठी अपडेट
SBI Bharati 2025 स्टेट बँक मध्ये भरती सुरू.पदवीधारकांना संधी
दरवाढ पुढीलप्रमाणे
- जात प्रमाणपत्र – पूर्वी 58 रुपये,आता 128 रुपये
- नाॅन क्रिमीलेयर- पूर्वी 58 रुपये, आता 128 रुपये
- रहिवासी प्रमाणपत्र – पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- उत्पन्न प्रमाणपत्र – पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- प्रतिज्ञापत्र -पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- शेतकरी प्रमाणपत्र -पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- भूमीहीन प्रमाणपत्र -पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- महिला आरक्षण प्रमाणपत्र -पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
- श्रावणबाळ योजना प्रमाणपत्र -पूर्वी 34 रुपये,आता 69 रुपये
2025-26 शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होणार असून शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे दाखले लागत असतात.परंतू शुल्क वाढ झाल्याने यांचा आर्थिक ताण पालकांना सहन करावा लागणार आहे.
सेवा केंद्राच्या संख्येत वाढ
नागरिकांना शासकीय कामे सुलभ होण्याकरिता सेवा केंद्राच्या संख्येत वाढ होत आहे.सेवा शुल्क वाढीने वंचित घटकांना कमी लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.