Bhu Aadhaar ULPIN : आता तुमच्या जमिनीचे सुद्धा बनणार आधारकार्ड,पहा भू-आधार आणि त्याचे फायदे
Bhu Aadhaar ULPIN आता तुमच्या जमिनीचे सुद्धा आधार कार्ड बनणार आहे.त्याला एक विशिष्ट 14 अंकी ओळख संख्या देऊन भू-आधार कार्ड ULPIN असे संबोधले जाणारे आहे.ही योजना लागू झाल्यानंतर जमिनीचे वादविवाद कमी होण्याची दाट शक्यता आहे.
अर्थसंकल्पात प्रस्ताव
नुकत्याच सादर झालेल्या अर्थ संकल्पात जमिन संबंधित सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागातील जमिनीसाठी विशेष ओळख म्हणजे भू-आधार आणि शहरी भूमि अभिलेख डिजिटलीकरण चार प्रस्ताव ठेवला आहे.यामुळे जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होईल.आणि. जमिनीचे संबंधित वाद संपुष्टात येतील.
वित्तीय सहकार्य
केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील सर्व जमिनींसाठी एक विशिष्ट ओळख संख्या देण्याची घोषणा करण्यात आली आहे 2027 पर्यंत शहरी भागातील भूमि अभिलेखाचे डिजिटलीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी केंद्र सरकार राज्यांना वित्तीय सहकार्य करणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भाषणात सांगितले की शहरी आणि ग्रामीण भूमि सुधारणासाठी राज्यांबरोबर मिळून काम करण्यात येईल.
भू-आधार कसे काम करेल
भूखंडाला पहिले जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून जिओ टॅगिंग केल जात. यामुळे निश्चित भौगोलिक स्थितीची ओळख होती. यानंतर मोजणी करणारा जमिनीचा सीमांची पडताळणी करतो आणि मोजणी करून जमीन मालकाचे नाव उपयुक्त क्षेत्र इ इत्यादी गोष्टी एकत्र करून ही रेकॉर्ड भूमी अभिलेख प्रबंधन प्रणाली मध्ये दाखल केले जाते.त्यानंतर स्वयंचलित प्रणाली जमीनीसाठी 14 अंकी भू-आधार संख्या तयार करेल जो डिजिटल रेकॉर्ड बरोबर जोडला जाईल.
भू-आधार मध्ये पुढील माहिती असणार
आधार कार्ड च्या धर्तीवर भू-आधारमध्ये राज्य कोड, जिल्हा कोड, तालुका कोड,गाव कोड जमिनीची विशिष्ट आय डी संख्या असणार आहेत.भू-आधार संख्येला डिजिटल आणि भौतिक भूमि रेकॉर्ड दस्तऐवज वर अंकीत असणार आहेत.
भू-आधारचे फायदे
भू-आधार मॅपच्या माध्यमातून योग्य भूमी अभिलेख सुनिश्चित केले जाते.भूखंड ओळखण्यासाठी अस्पष्ट असतात आणि हेच वादविवादाचे मुख्य कारण असते.